Crime news marathi : क्षुल्लक कारणावरून मुलाने आईच्या तोंडावर मारले कडे, ओठाला पडले ८ टाके; दुसीरीकडे व्यसनी मुलाचा बापाकडून खून

पुणे : पुणे शहरात कौटुंबिक वादातून होणारे गुन्हे आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणाऱ्या दोन वेगवेगळ्या धक्कादायक घटना शहरातून समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत गोकुळनगर परिसरात एका नराधम मुलाने कसलेही ठोस कारण नसताना आपल्या ६० वर्षांच्या वृद्ध आईला बेदम मारहाण करत तिच्या तोंडावर लोखंडी कड्याने प्रहार केला. तर दुसऱ्या घटनेत, वारजे माळवाडी येथे दारूच्या आहारी जाऊन दररोज त्रास देणाऱ्या मुलाचा त्याच्याच आई-वडिलांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.



आईच्या ओठावर लोखंडी कड्याने प्रहार; ८ टाके पडले



पहिली घटना गोकुळनगर भागातील राहत्या घरात २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. ६० वर्षीय आशा राजेंद्र सरोदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा राहुल सरोदे याने कोणत्याही कारणाशिवाय आईशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने आईला शिवीगाळ करत मारहाण केली आणि स्वतःच्या हातातील गोल लोखंडी कड्याने थेट आईच्या तोंडावर जोरदार वार केला. या प्राणघातक हल्ल्यात आशा सरोदे यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात ८ टाके घालावे लागले आहेत. या प्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत.



दारूच्या व्यसनाला कंटाळून आई-वडिलांनीच घेतला मुलाचा जीव


दुसरी सुन्न करणारी घटना वारजे माळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) हा तरुण दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता आणि रोज घरात आई-वडिलांशी वाद घालून त्यांना त्रास देत होता. या रोजच्या छळाला कंटाळून वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांनी मुलाची मारहाण करत गळा आवळून हत्या केली.



आई-वडिलांना अटक


या हत्येप्रकरणी मृत महेशचा भाऊ गणेश गायकवाड याने दिलेल्या तक्रारीवरून वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी आई आणि वडिलांना अटक केली आहे. पुण्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अशा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस