Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही एसयूव्ही १,००,००० रूपये या सुरुवातीच्या बुकिंग रक्कमेसह ऑडी इंडियाची वेबसाइट, ‘मायऑडी कनेक्ट' अॅप्लिकेशनवर किंवा ऑडी इंडियाच्या डीलरशिपद्वारे बुक केली जाऊ शकते.





ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, "आज आम्हाला ऑल-न्यू ऑडी क्यू३ ची बुकिंग सुरू करताना अत्यंत आनंद होत आहे. ही नवीन कार आजच्या ऑडी ग्राहकाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टींचा उत्तम संगम आहे, जसे आकर्षक व आधुनिक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डायनॅमिक परफॉर्मन्स आणि दैनंदिन वापरासाठीची उपयुक्तता. ही कार पूर्णपणे ऑडीचीच वैशिष्ट्ये जपून आहे, तरीही अधिक वैशिष्ट्यपूर्ण, अधिक सोपी आणि आजच्या ग्राहकांच्या जीवनशैलीशी जोडलेली आहे. नवीन क्यू३ बाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली आहे आणि आमचा एसयूव्ही पोर्टफोलिओ अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे बुकिंग सुरू होणे महत्त्वाचा टप्पा आहे."





नवीन ऑडी क्यू३ आकर्षक डिझाइन, विश्वासार्ह कार्यक्षमता आणि दैनंदिन वैविध्यततेचा मेळ साधत ऑडीच्या ‘क्यू' श्रेणीतील आपले स्थान अधिक दृढ करते. दमदार २.०-लिटर पेट्रोल इंजिनची शक्ती असलेली ही ऑल-न्यू ऑडी क्यू३ ऑडीच्या प्रसिद्ध क्वाट्रो ऑल-व्हील ड्राईव्ह तंत्रज्ञानासह आणि या सेगमेंटमधील अनेक पहिल्या वैशिष्ट्यांसह बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास