Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) महावितरणच्या नाशिक परिमंडळात ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडळातील ७४ हजार ५५७ ग्राहकांनी छतावर सौर यंत्रणा बसवून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी केले असून, ते स्वतःच वीज निर्माते बनले आहेत. या सौर यंत्रणांची एकूण क्षमता २६० मेगावॅट आहे. योजनेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.



प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद


महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. महावितरणच्या अहिल्यानगर मंडळात ३० हजार ४७५ ग्राहकांनी (१०२.७७ मेगावॅट), मालेगाव मंडळात ६ हजार ३५२ ग्राहकांनी (२१.७४ मेगावॅट), तर नाशिक मंडळात ३७ हजार ७३० ग्राहकांनी (१३५.९६ मेगावॅट) सौर यंत्रणा बसविली आहे. या योजनेअंतर्गत एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिन्याला अंदाजे १२० युनिट वीज निर्मिती होते.



बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जही उपलब्ध


निर्माण झालेली वीज घरगुती वापरासाठी उपयोगी पडते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यास वीजबिल शून्य होण्यास मदत होते. यामुळे ग्राहकांचा आर्थिक फायदा होण्याबरोबरच पर्यावरणाचेही संरक्षण होते. रूफटॉप सोलर प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक नेट मीटर मोफत बसविण्यात येत असून, १० किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी दिली जात आहे. तसेच या योजनेसाठी बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. योजनेची माहिती व नोंदणीसाठी https://www. pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. तसेच 'पीएम सूर्यघर' ('PM Suryaghar') हे मोबाईल अॅपही उपलब्ध असून, नोंदणीनंतर ग्राहकांना आपल्या पसंतीचा विक्रेता निवडता येतो. सौर प्रकल्प बसविल्यानंतर अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास