Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांतच दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बादशाह आणि ईशा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोटाची माहिती दिली. दोघांनीही हा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. (Badshah Isha Rikhi Divorce)


बादशाह आणि ईशा यांच्या लग्नाची माहिती याच वर्षी जून महिन्यात समोर आली होती. ईशाने इंस्टाग्रामवरील 'आस्क मी एनीथिंग' सेशनदरम्यान बादशाहसोबतच्या लग्नाला दुजोरा दिला होता. मात्र, लग्नानंतर दोघांनीही आपल्या नात्याबाबत सार्वजनिकरित्या फारशी चर्चा केली नाही. (Entertainment News)



जुलैपासून नात्यात दुराव्याच्या चर्चा


जुलै महिन्यापासून बादशाह आणि ईशा यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. २६ जुलै रोजी ईशाने बादशाहसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्टमध्ये तिने 'प्रत्येक वादळ एक धडा असतो' असे लिहिले होते. त्यासोबत तिने हार्टब्रेक इमोजीचाही वापर केला होता.


यानंतर ईशाने एका नोटद्वारे आपण बराच काळ भीतीमुळे गप्प राहिल्याचे सांगितले होते. मात्र, आता आत्मसन्मानासाठी बोलत असल्याचे तिने म्हटले होते. त्याच काळात ईशाची आई पूनम रिखी यांनीही सोशल मीडियावर कर्माशी संबंधित पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले होते.



'परस्पर संमतीने घेतला निर्णय'


अखेर बादशाह आणि ईशा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोटाची माहिती दिली. बादशाहने आपल्या पोस्टमध्ये हा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतल्याचे सांगितले. तसेच या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती चाहत्यांना केली. ( Badshah Marriage)


या विषयावर हेच आपले पहिले आणि शेवटचे वक्तव्य असल्याचेही बादशाहने स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत कोणतेही अंदाज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन त्याने केले आहे.



बादशाहचा दुसरा घटस्फोट


ईशा रिखीशी लग्न करण्यापूर्वी बादशाहने जॅस्मिन मसीहसोबत लग्न केले होते. २०१७ मध्ये त्यांना मुलगी झाली, तिचे नाव जेसेमी ग्रेस मसीह सिंग आहे. मात्र, वैवाहिक आयुष्यातील मतभेदांनंतर बादशाह आणि जॅस्मिन २०२० मध्ये वेगळे झाले होते. आता ईशा रिखीसोबतचे नातेही संपुष्टात आल्याने हा बादशाहचा दुसरा घटस्फोट ठरला आहे. ( Celebrity Divorce)

Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण