मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच आई होणार आहे. कश्मिराने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रेग्नन्सीची गोड बातमी दिली आहे. वयाच्या ४०व्या वर्षी ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. (Kashmira Irani Pregnancy)
कश्मिराने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये समुद्रकिनारी दोन नारळ ठेवलेले दिसत आहेत. एका नारळावर गुलाबी तर दुसऱ्यावर निळ्या रंगाची कॅप आणि गॉगल ठेवण्यात आले आहेत. या कॅपवर ‘Mom’ आणि ‘Dad’ असे लिहिलेले आहे. हा फोटो शेअर करत कश्मिराने ‘सध्याचं स्टेटस... लवकरच...’ असे कॅप्शन दिले आहे. (Kashmira Irani Pregnancy)
मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी झाली आहे. ' मिर्झापूर'च्या ...
कश्मिराच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यातील या नव्या पर्वाबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. (Kashmira Irani Pregnancy)
‘अंबर धारा’ मालिकेतून मिळाली लोकप्रियता :
कश्मिरा इराणीने मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘अंबर धारा’ या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’, ‘पीके’, ‘टायगर जिंदा है’, ‘रंगून’ आणि ‘भारत’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. (Kashmira Irani Pregnancy)
मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागातील एका ...
२०२४ मध्ये अक्षत सक्सेनासोबत लग्न :
कश्मिराने २०२४ मध्ये अक्षत सक्सेना यांच्यासोबत लग्न केले. अक्षत हे व्यवसायाने पायलट असून त्यांनी अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ते ‘सफेद सागर’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता कश्मिरा आणि अक्षत यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. कश्मिराने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केल्याने तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Kashmira Irani Pregnancy)
View this post on Instagram




