Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

- दिल्लीत दाखल; शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी


मुंबई : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे ही बैठक सुरू असतानाच शिंदे हे तातडीने राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Eknath Shinde)



एकनाथ शिंदे हे सोमवारी भीमाशंकर दौऱ्यावर असल्यामुळे मुंबईत परतण्यास उशीर झाल्याने ते कॅबिनेट बैठकीला पोहचू शकले नाहीत, अशी चर्चा असली तरी त्यांच्या या गैरहजेरीला राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणी उबाठा गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. देवदत्त कामत यांनी युक्तिवाद पूर्ण केला असून, आता शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत. न्यायालयातील या सुनावणीच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्यामुळे ते विधितज्ज्ञांसोबतच केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Eknath Shinde)



मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाले?


- २०२९ पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण जाहीर
- शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक
- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा.
- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला ५ हजार ७०४ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता. १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार

Comments
Add Comment

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस