Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्रालयात आयोजित कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी कुक्कुटपालन व्यावसायिकांना शासनाच्या विविध योजना, सवलती व सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला.



या बैठकीला पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक संजय सावंत, योगेश बेळणेकर, श्रीपाद तवटे, सुनील धुरी, रमेश म्हाडगुत आणि प्रशांत म्हाडगुत उपस्थित होते, तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक व स्थानिक उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे सांगत मंत्री राणे यांनी प्रशासकीय व तांत्रिक सहकार्य त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.



व्यवसायाचा विस्तार करताना व्यावसायिकांनी वीज जोडणीबाबत नियमांचे पालन करावे आणि घरगुती वीज जोडणीऐवजी व्यवसायाच्या स्वरूपानुसार व्यावसायिक वीज जोडणी करून घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. तसेच, कुक्कुटपालन क्षेत्र अधिक संघटित, सक्षम आणि फायदेशीर ठरावे यासाठी स्वतंत्र 'फार्मिंग कंपनी' स्थापन करण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आल्या.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा कसारा येथे मेगाब्लॉक; 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेवर आसनगाव - कसारा तिसरी मार्गिका प्रकल्प आणि कसारा यार्डमधील 'अप' यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील