IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्यानंतर विमानतळावर 'फुल इमर्जन्सी' घोषित करण्यात आली होती. सुदैवाने, विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.



उड्डाणानंतर अवघ्या १० मिनिटांत आणीबाणी जाहीर



मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे फ्लाईट नंबर 6E 2102 या विमानाने गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (मोपा) सकाळी ९:१६ वाजता दिल्लीसाठी उड्डाण केले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत, म्हणजेच सकाळी ९:२५ वाजता विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या (Pilot) लक्षात आले. त्यानंतर तात्काळ आणीबाणी घोषित करण्यात आली आणि सकाळी ९:५० वाजता हे विमान पुन्हा गोव्यात सुरक्षित उतरवण्यात आले.



२२९ प्रवासी सुखरूप


या दिल्लीगामी विमानात एकूण २२९ प्रवासी सवार होते. विमानाचे इंजिन अचानक बंद पडल्याचे किंवा त्यात बिघाड झाल्याचे समजताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.



विमानाची तपासणी आणि कंपनीचे स्पष्टीकरण


या घटनेनंतर इंडिगो एअरलाइन्सने अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे. "तांत्रिक समस्येची ओळख पटल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे लँडिंग करण्यात आले. सध्या हे विमान दुरुस्ती आणि सुरक्षेच्या तपासणीखाली (Maintenance Checks) आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच हे विमान पुन्हा सेवेत दाखल केले जाईल," असे कंपनीने स्पष्ट केले आहे.



प्रवाशांसाठी पर्यायी सोय


विमानात झालेल्या या अडथळ्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, त्याबद्दल कंपनीने खंत व्यक्त केली आहे. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना नाश्ता व पेये देण्यात आली असून वेळेवर अपडेट्स दिले जात आहेत. तसेच सर्व २२९ प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी (दिल्ली) पोहोचवण्यासाठी एअरलाइन्सकडून तात्काळ दुसऱ्या विमानाची (Alternative Arrangement) व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक