GST Revenue Surge : ऑगस्टमध्ये जीएसटी महसूल 14.8 टक्क्यांनी वाढून सुमारे दोन लाख कोटींवर पोहोचला

नवी दिल्ली : देशाचे जीएसटी महसूल संकलन ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर 14.8 टक्क्यांनी वाढून सुमारे 2 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण जीएसटी महसूल संकलन 1.74 लाख कोटी रुपये झाले होते.



जीएसटी महासंचालनालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण माल आणि सेवा कर (जीएसटी) महसूल संकलन ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर 14.8 टक्क्यांनी वाढून 1,99,853 कोटी रुपये (सुमारे दोन लाख कोटी रुपये) झाले आहे. या कालावधीत निव्वळ जीएसटी महसूल संकलन 1.68 लाख कोटी रुपये राहिले आहे, जे वार्षिक आधारावर 8.3 टक्क्यांची वाढ आहे.



आकडेवारीनुसार, देशांतर्गत व्यवहारांमधून जीएसटी महसूल 9.3 टक्क्यांनी वाढून 1.37 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. आयातीतून मिळणारा महसूल 29 टक्क्यांच्या वाढीसह 62,604 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे सकल केंद्रीय जीएसटी संकलन ऑगस्टमध्ये 38,413 कोटी रुपये राहिले, राज्य जीएसटी संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी संकलन 1.15 लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे. जीएसटी महासंचालनालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये ‘रिफंड’ (प्रतिदाय) 68 टक्क्यांनी वाढून 31,795 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास