MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही एकात्मिक डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून जमिनीच्या मालकीहक्कापासून व्यवहार आणि न्यायालयीन प्रकरणांपर्यंतची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. (MahaBhumi Stack)



सध्या महाभूलेख, महाभूनकाशा आणि IDRS यांसारख्या वेगवेगळ्या प्रणालींवर उपलब्ध असलेली माहिती आता एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. ग्रामीण भागात गट क्रमांक, तर शहरी भागात CTS/सिटी सर्व्हे क्रमांक टाकून संबंधित भूखंडाची माहिती शोधता येईल. (MahaBhumi Stack)


या प्रणालीमध्ये ३.५ कोटींहून अधिक ७/१२ आणि ८-अ अभिलेख, १.५ कोटींहून अधिक भू-नकाशे आणि मिळकत पत्रिका तसेच ४० कोटींहून अधिक जुने फेरफार व अभिलेख उपलब्ध आहेत. जमीन खरेदीपूर्वी नागरिकांना संबंधित भूखंडाचा सध्याचा वापरकर्ता, बोजे, मागील फेरफार, नोंदणीकृत व्यवहार आणि न्यायालयीन प्रकरणांची स्थिती तपासता येणार आहे. त्यामुळे फसवणुकीला आळा बसण्यासोबतच मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. (MahaBhumi Stack)



७/१२, ८-अ, नकाशा, फेरफार स्थिती, मोजणी अर्ज आणि दस्त शोध यांसारख्या विविध सेवाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाभूमी स्टॅकमुळे गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात या प्रणालीमध्ये GIS, AI आधारित शोध सुविधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रणालींचे एकात्मीकरण करण्याचे नियोजन आहे. (MahaBhumi Stack)

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची