- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार, शीतगृह आणि विक्री केंद्र उभारण्याच्या हालचालींना वेग आला असून, या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. मंत्रालयात मंगळवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मालेगावसह सांगली येथील आधुनिक मासळी बाजाराचे काम गतीने आणि अत्याधुनिक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Nitesh Rane)
या बैठकीला मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार भावना गवळी, वाशिमचे जिल्हाधिकारी, संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता मोहपात्रा सहभागी झाले होते. (Nitesh Rane)
ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३ हून अधिक मुद्द्यांवर सविस्तर ...
मालेगाव येथे आधुनिक मासळी बाजार उभारण्यासाठी लवकरात लवकर योग्य जागा निश्चित करून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तो पाठपुरावा करून मालेगावमध्ये सर्व सुविधांनीयुक्त आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारा अत्याधुनिक मासळी बाजार उभारला जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. या प्रकल्पामुळे स्थानिक मासळी विक्रेते आणि मच्छीमारांना व्यवसायासाठी उत्तम सोयीसुविधा मिळणार असून नागरिकांनाही स्वच्छ वातावरणात मासळी खरेदी करणे सुलभ होणार आहे. (Nitesh Rane)
नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी ३१ ऑगस्टपर्यंत ७.८ कोटींपेक्षा ...
दुसरीकडे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सांगली येथे विकसित होत असलेल्या आधुनिक मासळी बाजाराच्या बांधकामाच्या सद्यस्थितीचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. सांगलीतील या प्रकल्पाचे काम वेळेत आणि गतीने पूर्ण करून उद्घाटनाची तारीख लवकरात लवकर निश्चित करावी, अशा स्पष्ट सूचनाही मंत्री राणे यांनी यंत्रणेला दिल्या. या दोन्ही आधुनिक प्रकल्पांमुळे राज्यातील मासळी व्यवसायाला अधिक शिस्तबद्ध आणि व्यावसायिक स्वरूप प्राप्त होण्यास मोठी मदत होणार आहे. (Nitesh Rane)






