Nashik : ...अन् बिबट्या थेट घरात शिरला, कुटुंबियांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने चक्क तालुक्यातील (Peth Taluka) हरणगाव शिवारातील एका घरात प्रवेश केल्याची थरारक घटना घडली आहे. मात्र, घरातील कुटुंबीयांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे चार तासांच्या थरारानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश आले आहे.(Nashik News)



नेमकं प्रकरण काय ?


सुभाष रघुनाथ भरसट हे हरणगाव शिवारातील मळ्यात राहतात. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत एक बिबट्या त्यांच्या थेट घरात शिरला. विशेष म्हणजे घरातील हालचालींमुळे बिबट्याची चाहूल लागताच भरसट कुटुंबीय सुरुवातीला घाबरले मात्र नंतर ही परिस्थिती त्यांनी मोठ्या धैर्याने हाताळली. कुटुंबीयांनी सावधपणे घराचे दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद केल्या. त्यामुळे बिबट्या घरातच बंदिस्त झाला आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (Nashik News)



अन् चार तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद


घडलेल्या घटनाक्रमाबाबत माहिती मिळताच हरणगावच्या सरपंच पल्लवी भरसट यांनी तातडीने वन विभागाशी (Forest Department) संपर्क साधला. माहिती मिळताच ननाशी वनपरिक्षेत्रातील महाजे राऊंडचा वन स्टाफ आणि नाशिकची विशेष रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वन विभाग आणि रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने मोहीम राबवत पहाटे साडेचार वाजता बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात डांबले.बिबट्या सुखरूप जेरबंद झाल्याने भरसट कुटुंबीयांसह संपूर्ण हरणगाव परिसराने सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र बिबट्याच्या थेट घरातील शिरकावाने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Comments
Add Comment

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

'घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...', युजवेंद्र चहलने दारूच्या व्यसनावर धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा फिरकीपटू गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. काही ना काही त्याच्या

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या