Nashik : नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे-हरकती असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना ६ भरून नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन सुरु
प्रारूप यादीत नाव नसलेल्या ए.एस.डीडी मतदारांची यादी संभाव्य कारणांसह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच nashik. gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलीआहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, दुरुस्तीसाठी नमुना ८, तर नाव वगळण्यास हरकत घेण्यासाठी नमुना ७भरता येईल. अर्ज voters.eci. gov.in वर ऑनलाइन उपलब्ध आहेत. चुकीची माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) सुरू असून, मतदारांच्या नोंदींची तांत्रिक पद्धतीने पडताळणी केली जात आहे. विसंगती, वयातील तफावत व समान छायाचित्रांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
Nashik Kumbhmela : हिंदू धर्मीयांच्या आस्थेशी जोडलेल्या कुंभमेळ्याने गतवर्षी प्रयागराजमध्ये गर्दीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. आता २०२७ मध्ये ...
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा
एसआयआर दरम्यान आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांना नोटीस देऊन कागदपत्रांच्या आधारे बाजू तपासली जाईल. कोणत्याही प्रकारे अनियमितपणे नोंदी वगळल्या जात नसून प्रत्येक प्रकरणाची नियमानुसार पडताळणी होत आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास मुदतीत दावे-हरकती दाखल कराव्यात. तसेच राजकीय पक्षांनी बीएलएची नियुक्ती करावी असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी केले आहे.






