Nashik : मुक्त विद्यापीठाच्या १३० शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Nashik : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) १३ विद्याशाखांतील १३० पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका व प्रमाणपत्र शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस विनाविलंब शुल्कासह १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या जुलै सत्रासाठी ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.


विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार पारंपरिक तसेच विविध नवीन व व्यावसायिक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल तंत्रज्ञान, सायबर क्राईम तपास, डेटा ॲनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, योगशिक्षक, समुपदेशन व मानसिक स्वास्थ्य, भारतीय ज्ञान प्रणाली आदी शिक्षणक्रमांचा त्यात समावेश आहे.



विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण पद्धतीमुळे नोकरी-व्यवसाय करणारे, गृहिणी तसेच नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नवीन नियमानुसार नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे आणखी एक पदवी किंवा मुक्त विद्यापीठाच्या दोन पदव्यांना एकाचवेळी प्रवेश घेता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश घ्यावा किंवा नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२५३-२२३०५८० / २२३१७१५ / २२३०१०६ / २२३०७१४ तसेच ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२, ९२७२०४६७२५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे व विद्यार्थी सेवा विभाग संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.


विद्यापीठातील निरंतर शिक्षण, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषिविज्ञान, शिक्षणशास्त्र, आरोग्य विज्ञान, स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशन, संगणकशास्त्र, महाज्ञानदीप, ग्रामीण विकास व उद्योजकता, ललित कला केंद्र तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास या १३ विद्याशाखांमधील १३० शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) महावितरणच्या

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Drug Free Maharashtra : महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी २०२९ची डेडलाईन

- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त

Crime news marathi : क्षुल्लक कारणावरून मुलाने आईच्या तोंडावर मारले कडे, ओठाला पडले ८ टाके; दुसीरीकडे व्यसनी मुलाचा बापाकडून खून

पुणे : पुणे शहरात कौटुंबिक वादातून होणारे गुन्हे आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. कौटुंबिक

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Ola S1Z Electric Scooter भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि रेंज

मुंबई : इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Ola Electricने नवीन Ola S1Z इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च