Tuesday, September 1, 2026

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नागरिकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. "गरज नसेल तर सोने खरेदी टाळा आणि शक्यतो परदेशातील लग्नसोहळे टाळा," अशी साद सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे देशवासीयांना घातली आहे. या आवाहनानंतर आणि सरकारच्या संभाव्य धोरणात्मक बदलांमुळे आज, १ सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

इंपोर्ट ड्युटी कमी होण्याचे संकेत

सोन्याची अवाजवी खरेदी रोखण्यासाठी सरकारने यापूर्वी सोन्यावरील आयात शुल्क (Import Duty) ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. मात्र, या निर्णयामुळे सोने खरेदी कमी होण्याऐवजी बेकायदेशीर आयात आणि तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता सरकार सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या तयारीत आहे. आयात शुल्क घटल्यास सोन्याचे भाव अधिक खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MCX वर सोन्या-चांदीची घसरण; चांदी ५,००० रुपयांनी स्वस्त

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये आज मौल्यवान धातूंच्या दरावर थेट परिणाम पाहायला मिळाला:

  • सोन्याचे दर: सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३१० रुपयांची घसरण झाली असून, सध्या सोने प्रति १० ग्रॅम १५४,१५० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
  • चांदीचे दर: चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. प्रति किलो चांदीमागे तब्बल ५,००० रुपयांची घट झाली असून, चांदीचा दर प्रति किलो २,५०,००० रुपयांवर आला आहे. (१० ग्रॅम चांदी २,५०० रुपये, तर १०० ग्रॅम चांदी २५,००० रुपयांवर पोहोचली आहे).

जागतिक घडामोडींचाही दरावर परिणाम

फक्त देशांतर्गत कारणेच नाही, तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही या घसरणीत मोठा वाटा आहे. बाजार विश्लेषक टोनी सायकामोर यांच्या माहितीनुसार, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांची कठोर भूमिका आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) परिसरातील वाढता राजकीय तणाव यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. या जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत सरकारी धोरणे या दोन्ही घटकांमुळे सध्या सोन्या-चांदीच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >