Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. एका कार्यक्रमात ते शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसमोर ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली जबाबदारीही पार पाडली पाहिजे, असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. “आपल्या परिसरातील एखादी महापालिका शाळा निवडून तिच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान द्यावे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील ज्ञान मिळावे यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून द्यावे आणि अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. आर्थिक मदतीऐवजी आपल्या शाळेतील शिक्षकांनी महिन्यातून एकदा त्या शाळेला भेट देऊन चांगल्या शैक्षणिक व व्यवस्थापन पद्धती शेअर कराव्यात,” अशी भूमिका त्यांनी मांडली.



यावेळी त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्य विकासाच्या महत्त्वावरही विशेष भर दिला. विद्यार्थ्यांना लहान वयापासून विविध कौशल्यांचे शिक्षण मिळणे आवश्यक असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासासोबतच श्रम आणि कष्ट करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. भारतात ब्लू-कॉलर कामांविषयी असलेली सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी कौशल्याधारित शिक्षण हा त्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा, गुण आणि पदवी नसून संस्कार, संस्कृती, मूल्ये, वारसा आणि आत्मविश्वास यांचाही शिक्षणात तितकाच महत्त्वाचा वाटा आहे, असेही लोढा यांनी अधोरेखित केले. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत सातत्याने परिवर्तन आवश्यक असून, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले.


भारताची शिक्षणव्यवस्था ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हती, तर कौशल्य, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, संस्कृती आणि जीवनोपयोगी शिक्षणाची समृद्ध परंपरा भारतात पूर्वीपासून होती. ब्रिटिश राजवटीत ही पारंपरिक शिक्षणपद्धती मोडून काढत पाठांतर आणि नोकरीकेंद्री शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले, अशी भूमिका मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून भारतीय शिक्षणाच्या या समृद्ध परंपरेला आधुनिक कौशल्ये आणि तंत्रज्ञानाची जोड देत पुन्हा सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे. कौशल्याधारित शिक्षण, भारतीय संस्कृती, मूल्ये, आत्मविश्वास आणि व्यावहारिक ज्ञान यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने ही नवी शिक्षणव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.



‘ड्रग-फ्री मुंबई’साठी शाळांनी पुढाकार घ्यावा


विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालक, शिक्षक आणि समुपदेशकांनी एकत्र काम करण्याचे मंत्री लोढा यांचे आवाहन ‘ड्रग-फ्री मुंबई’ अभियानात राज्यातील शाळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. प्रत्येक शाळेने दोन पालक, दोन शिक्षक आणि एका समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी अथवा समुपदेशकाचा समावेश असलेली छोटी समिती स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करावी, अशी सूचना त्यांनी केली. “पालकांनी केवळ उत्तम शाळा, सुविधा आणि शिक्षण दिले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. मुलांना वेळ, प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या आयुष्यातील घडामोडींमध्ये पालकांचा सहभागही आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज व्यक्त केली. ‘ड्रग-फ्री मुंबई’ हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता शाळा, शिक्षक आणि पालकांनी मिळून उभारलेली सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे आवाहन लोढा यांनी केले.

Comments
Add Comment

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना