Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऑस्ट्रेलियातील ‘न्यू साउथ वेल्स’सोबत सामंजस्य करार

-वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि कौशल्य विकासासह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर भर; ९० दिवसांत संयुक्त कार्यगट स्थापन होणार


मुंबई : महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि परिणामाभिमुख करण्याच्या दिशेने बुधवारी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा शासकीय निवासस्थानी वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, कृषी तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. २०४७ पर्यंत महाराष्ट्राला विकसित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राज्य बनवण्याच्या उद्दिष्टाशी हा करार सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.



मुंबई आणि सिडनी ही अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलियाची वित्तीय व व्यावसायिक प्रवेशद्वारे असल्यामुळे न्यू साउथ वेल्समधील वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राला भारतातील गुंतवणुकीचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अक्षय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर आणि हरित हायड्रोजन या क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्प विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, न्यू साउथ वेल्सच्या तंत्रज्ञानाचा फायदा मराठवाडा व विदर्भातील कृषी, जलसंधारण आणि दुष्काळ व्यवस्थापनासाठी घेण्यावर भर देण्यात आला.



या कराराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील ९० दिवसांत एका संयुक्त कार्यगटाची स्थापना केली जाणार असून, हा गट प्रमुख प्रकल्प निश्चित करून नियमित आढावा घेईल. या बैठकीस राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, न्यू साउथ वेल्सचे ट्रेझरर डॅनियल मुखी, भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांच्यासह दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सिडनी भेटीचे अधिकृत निमंत्रणही दिले.

Comments
Add Comment

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना