Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. उघड्या ज्योतीमुळे डब्याला आग लागण्याची तसेच प्रवाशांच्या जीविताला आणि रेल्वेच्या मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेसमध्ये (Hazrat Nizamuddin-Mysuru Express) हा प्रकार घडला. संबंधित प्रवाशाला भुसावळ रेल्वे स्थानकावर (Bhusawal Railway Station) उतरवून रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.


मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२७८२ हजरत निजामुद्दीन-म्हैसूर एक्स्प्रेसच्या ए-१ कोचमधील बर्थ क्रमांक १७ वर एक प्रवासी दिवा लावून पूजा करीत असल्याची माहिती भुसावळ येथील कमर्शियल कंट्रोल रूमला मिळाली होती. खंडवा येथे कर्तव्यावर असलेले तिकीट तपासणी अधिकारी रमण कुमार शर्मा यांनी ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आवश्यक कारवाईसाठी संबंधित प्रवाशाला भुसावळ स्थानकावर गाडीतून उतरवण्यात आले. चौकशीदरम्यान त्याची ओळख मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ५५ वर्षीय गरीबा अशी झाली. सायंकाळची प्रार्थना करताना आपल्या आरक्षित बर्थवर दिवा लावल्याचे त्याने रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.



सूचना देऊनही दिवा विझवण्यास नकार


प्रवाशाने दिवा लावल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावरील टीटीईने त्याला तत्काळ दिवा विझवण्याची सूचना केली. धावत्या रेल्वेत उघडी ज्योत ठेवणे धोकादायक असून, त्यातून आग लागल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच रेल्वेच्या मालमत्तेलाही मोठे नुकसान होऊ शकते, असे त्याला समजावून सांगण्यात आले. मात्र, प्रार्थना पूर्ण झाल्यानंतरच दिवा विझवणार, असे प्रवाशाने सांगितले. त्यानंतर टीटीईने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला. घटनास्थळावरून एक आगपेटी, एक पितळी दिवा आणि एक स्टीलचा कंटेनर जप्त करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने या घटनेकडे केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक कृती म्हणून पाहिले आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई केली.



रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल


प्रवाशांच्या आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेला संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या या कृत्याबद्दल संबंधित प्रवाशाविरुद्ध रेल्वे कायदा, १९८९ मधील कलम १५३ आणि १४५ (ब) अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आली. आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर संबंधित प्रवाशाला भारतीय न्याय संहितेतील अर्थात बीएनएसमधील कलम ३५ (सी) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान कोणतेही ज्वलनशील पदार्थ नेऊ नयेत, तसेच दिवे, मेणबत्त्या, अगरबत्ती किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या उघड्या ज्योतींचा वापर करू नये, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धावत्या गाडीमध्ये आगीची छोटीशी ठिणगीही मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या श्रद्धा किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी डब्यात उघड्या ज्योतीचा वापर न करता सुरक्षित पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Chandrapur ashram school food poisoning : चंद्रपुरात भयंकर प्रकार! वरणाच्या पातेल्यात शिजली पाल; आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा!

महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळांमधील सुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयात सकारात्मक माहिती दिल्यानंतर लगेचच ही

Dr Sampada Munde Suicide Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; गृह विभागाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात

Maharashtra Weather Update : पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' १३ जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा इशारा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर