Kunbi records : ५८ लाख कुणबी नोंदींचा डेटा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द; १ हजार ५०९ पैकी १ हजार ३७३ गुन्हे मागे

एकट्या मराठवाड्यात साडेतीन लाख प्रमाणपत्रे वितरित झाल्याची शासनाची माहिती


मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत केलेल्या प्रशासकीय कार्यवाहीची सविस्तर आकडेवारी बुधवारी जाहीर केली. मराठवाड्यात सुमारे साडेतीन लाख प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून, ५८ लाख नोंदींचा डेटा डिजिटल स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सरकारच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच १० ते १७ सप्टेंबरदरम्यान 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' राबवून पात्र नागरिकांच्या अर्जांची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाणार आहे.



मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी ही भूमिका मांडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील गायकवाड आयोग आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या १० टक्के एसईबीसी आरक्षणाचा उल्लेख करण्यात आला. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या महसूल नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून आतापर्यंत मराठवाड्यात साडेतीन लाख दाखले देण्यात आले आहेत. तसेच ५८ लाख नोंदींचा डेटा पेनड्राइव्हद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र 'मराठा कक्ष' स्थापन करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात 'नोडल अधिकारी' नेमण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटनुसारही प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले आहेत.



याशिवाय, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर बोलताना सरकारने स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या १ हजार ५०९ गुन्ह्यांपैकी १ हजार ३७३ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित १०८ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सरकारने आपले निर्णय आणि मसुदा सादर केला असून, आता आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेवर पुढील दिशा अवलंबून असणार आहे.

Comments
Add Comment

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Ramayan: रामायण 'राइज ऑफ अ लिजेंड' रचणार इतिहास! भारतासाठी ठरला अभिमानाचा क्षण

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारतीय सिनेमाचा भव्य आविष्कार आणि दिवाळीचा उत्साह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत,

Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

Entertainment News: अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

टीम इंडियाच्या मालिका विजयाचं गणित पावसामुळे भंगलं, पण कर्णधार श्रेयस अय्यरला मिळालं खास मेडल; कारण..

[caption id="attachment_1067421" align="aligncenter" width="800"] भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. पण या