मुंबई : मुंबई सहकारी मंडळाच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’च्या सर्व २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. (Mumbai Cooperative Board)
प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’ने निवडणूक लढवली. या पॅनेलच्या सर्व उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. ( Sahakar Panel)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर डीलर्ससाठी स्टॉक लिमिट कमी करण्याची ...
नवनिर्वाचित संचालक मंडळात प्रवीण यशवंत दरेकर, मिलिंद कांबळे, अंकुश जाधव, अमोल खरात, वर्षा माळी, शिवाजीराव नलावडे, नितीन बनकर, सतीश सावर्डेकर, विजय जाधव, अनिल गजरे, अनिल कांबळे, बाळासाहेब घाडगे, मिलिंद राऊत, श्रीधर जगताप, किशोर पाटणकर, प्रवीण डिकले, सुरेश भालेराव, विठ्ठल वाळुंज, जयंत शिरसिकर, मदन यादव आणि अनिषा माजगावकर यांचा समावेश आहे. ( Pravin Darekar)
नवीन संचालक मंडळ मुंबईतील सहकारी चळवळ अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहे. सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पदाधिकारी आणि सभासदांना प्रशिक्षण देणे तसेच सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि व्यावसायिकता वाढवण्याचे काम केले जाणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
“संघर्षाऐवजी समन्वय, स्पर्धेऐवजी सहकार्य आणि वैयक्तिक विचारांपेक्षा संस्थेच्या व्यापक हिताला प्राधान्य देण्याचा संदेश या बिनविरोध निवडणुकीतून गेला आहे,” असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, मुंबई सहकारी क्षेत्रातील विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले असून, नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ( Maharashtra Cooperative Union)






