Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील येवला (Yeola) तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे जुन्या वादाची कुरापत काढून प्रवीण ऊर्फ सोन्या अशोक जाधव याने शेजारी राहणाऱ्या संगीता कोळी व त्यांची मुलगी जयश्री कोळी यांच्यावर शेतात गवत कापत असताना कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जयश्री यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) हलवण्यात आले आहे, तर संगीता कोळी यांच्यावर येवल्यात उपचार सुरू आहेत.
Nashik Crime : मनमाड शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गुंजाळ यांच्या विशेष पथकाने मध्यरात्री ...
आरोपीवर यापूर्वीही पीडितांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला होता आणि तो जामिनावर बाहेर आला होता. घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस (Yewla Taluka Police) निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार माळोदे व पथकाने अवघ्या दोन तासांत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.





