Nashik :'राहुल गांधी गो बॅक'….नाशिक दौऱ्यादरम्यान भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी

Nashik : पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील काँग्रेसच्या ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी ते नाशिक येथील प्रशिक्षण शिबिरात संवाद साधणार आहेत. यावेळी ‘जागतिक राजकारण आणि भारत’ या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरण परिसरातील कार्यक्रमस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरणाकडे जाणारा रस्ता लोखंडी जाळ्या अर्थात बॅरिकेडिंगने बंद करण्यात आला आहे.



दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून 'राहुल गांधी','गो बॅक' चे नारे देण्यात आलेत. यावेळी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसचा निषेध असो, नारीशक्तीचा विजय असो 'राहुल गांधी','गो बॅक' अशा स्वरुपाचे फलक हातात घेऊन भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. यावेळी आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande), नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके, (Mayor Himgauri Aher-Adke) माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’ला (महिला आरक्षण विधेयक) विरोध केल्याचा आरोप करत नाशिक भाजपच्या महिला पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे निषेध आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि प्रमुख पदाधिकारी यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आहेत. काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध करून महिलांच्या अधिकारांवर गदा आणली आहे, असा आरोप करत भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Comments
Add Comment

Kolkata Stampede : कोलकाता दुर्गापूजा चेंगराचेंगरी प्रकरणात आयोजकांसह 7 जणांना अटक; घोषणेमुळे गर्दी उसळल्याचा दावा

Kolkata Stampede: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे चोरबागान दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष

Madhya Pradesh Accident : धक्कादायक! मध्य प्रदेशात मंदिराजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराजवळ शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला.