Pakistan Cricket Crisis : पाकिस्तान क्रिकेटमध्ये २४ तासांत मोठी उलथापालथ; ७ खेळाडूंना मायदेशी पाठवलं, मिस्बाह-उल-हकचा राजीनामा

पाकिस्तान : पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या २४ तासांत घडलेल्या घटनांनी क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघातील तब्बल सात खेळाडूंना संघातून मुक्त करून मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य मिस्बाह-उल-हकने राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. (Pakistan Cricket Crisis)


या घडामोडींमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि संघाच्या व्यवस्थापनातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. कसोटी संघ आणि प्रशिक्षक वर्गात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Pakistan Cricket Crisis)



मिस्बाह-उल-हकचा तडकाफडकी निर्णय :


मिळालेल्या माहितीनुसार, मिस्बाह-उल-हकने आपल्या राजीनाम्याच्या निर्णयाची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिली आहे. मात्र, त्याने औपचारिकपणे पद सोडण्यापूर्वी नियमानुसार नोटीस कालावधी पूर्ण करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ESPNcricinfoच्या वृत्तानुसार, मिस्बाहने राजीनामा सादर केला असला तरी PCBने तो अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे बोर्ड यावर पुढे काय निर्णय घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Pakistan Cricket Crisis)



संघातील बदलांवर मिस्बाह नाराज?


संघात एवढे मोठे बदल करण्यात येत असताना निवड समितीचा सदस्य म्हणून आपल्याशी पुरेशी चर्चा करण्यात आली नसल्याने मिस्बाह नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरच त्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. (Pakistan Cricket Crisis)



सात खेळाडूंना संघातून मुक्त :


PCBने पाकिस्तान संघातील मोहम्मद रिझवान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, अली उस्मान, आमिर जमाल, मुहम्मद अवैस जफर आणि खुर्रम शहजाद या सात खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिका पाकिस्तानने २-० ने जिंकलेली असतानाही हे बदल करण्यात आले आहेत. मालिकेतील अंतिम सामना अद्याप बाकी असताना झालेल्या या निर्णयामुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Pakistan Cricket Crisis)



पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद?


एकीकडे सात खेळाडूंना मायदेशी पाठवणे आणि दुसरीकडे राष्ट्रीय निवड समितीतील महत्त्वाच्या सदस्याचा राजीनामा, यामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत परिस्थितीवर चर्चा सुरू झाली आहे. प्रशिक्षकवर्ग आणि कसोटी संघातील फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयांकडे पाहिले जात आहे. मिस्बाहचा राजीनामा PCB स्वीकारणार का आणि सात खेळाडूंना संघातून मुक्त करण्यामागे नेमकी रणनीती काय आहे, याबाबत आता अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. (Pakistan Cricket Crisis)

Comments
Add Comment

Hardik Pandya Injury : हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाला पुन्हा ब्रेक! सरावादरम्यान पायाला दुखापत, अफगाणिस्तान मालिकेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे.

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल