मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (COE) सराव करताना त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. (Hardik Pandya Injury)
हार्दिक सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत होता. तो पूर्ण क्षमतेने सराव करत होता. मात्र, पायाला त्रास जाणवल्यानंतर त्याला काही काळ गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात असले तरी त्याला पुन्हा गोलंदाजी सुरू करण्यासाठी वैद्यकीय पथकाच्या परवानगीची आवश्यकता असेल. (Hardik Pandya Injury)
दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. ...
अफगाणिस्तान मालिकेसाठी फिटनेस टेस्ट महत्त्वाची :
अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून दिल्लीत सुरू होणार आहे. या मालिकेसाठी हार्दिकला आवश्यक तंदुरुस्ती वेळेत मिळवता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरावादरम्यान फलंदाजी आणि हालचाली करताना हार्दिकला कोणतीही मोठी अडचण जाणवत नव्हती. मात्र, पायाच्या नव्या समस्येमुळे त्याच्या पुनरागमनाच्या योजनांना धक्का बसला आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय आणि फिटनेस टीमकडून पूर्णपणे फिट घोषित केल्यानंतरच त्याच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. (Hardik Pandya Injury)
निवड समितीच्या बैठकीत होणार निर्णय :
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवड समितीची बैठक दिल्लीत होण्याची शक्यता असून, बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार आणि पुनर्वसन घेत असलेल्या खेळाडूंच्या फिटनेसबाबत समितीला माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या ताज्या दुखापतीची वेळ त्याच्यासाठी निश्चितच चिंतेची आहे. जर त्याने वेळेत पूर्ण फिटनेस मिळवला नाही, तर त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागू शकते. (Hardik Pandya Injury)
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरच्या ...
बराच काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर :
हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून २४ मे रोजी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर त्याने कोणताही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. भारतासाठी त्याचा शेवटचा सामना ८ मार्च रोजी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झाला होता. यानंतर हार्दिकला अफगाणिस्तानविरुद्धची मायदेशातील व्हाईट-बॉल मालिका तसेच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यालाही मुकावे लागले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून त्याचा दुरावा वाढत असताना, आता नव्या दुखापतीमुळे त्याच्या पुनरागमनाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. (Hardik Pandya Injury)