BMC Engineers Transfer Online : महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या आता ऑनलाईन?

- प्रशासनाच्यावतीने आता बदल्यांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरण्याच्या हालचाली


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांसाठी अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनी शिफारस पत्र दिल्यामुळे महापालिकेतील बदल्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. अभियंत्यांच्या बदल्यांमधील आर्थिक गैरव्यवहाराचा होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता अभियंत्यांच्या बदल्या या आता ऑनलाईन पध्दतीने केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (BMC Engineers Transfer Online)


मुंबई महापालिकेतील सहायक अभियंता, उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच कनिष्ठ अभिंयता या पदावरील सुमारे २२५ अभियंत्यांच्या बदल्यांसाठी राजकीय पक्षांच्या आमदार आणि खासदारांकडून शिफारस पत्र महापालिका नगर अभियंता विभागाला प्राप्त झाली आहे. या सुमारे २२५ अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी शिफारस पत्र दिल्यामुळे सध्या हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. (BMC Engineers Transfer Online)



मात्र, अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहाराचा आरोप लक्षात घेता यापुढे विविध संवर्गातील अभियंत्यांची बदली ही ऑनलाईन पध्दतीने केली जाण्याची दाट शक्यता आहे. या अभियंत्यांची बदली ऑनलाईन पध्दतीने करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यापूर्वीच केली आहे. या त्यांच्या मागणीचा विचार प्रशासन स्तरावर होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. (BMC Engineers Transfer Online)



अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या चिठ्ठी स्वरुपात लॉटरी पध्दतीने काढण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने चिठ्ठी स्वरुपात लॉटरी पध्दतीने बदल्या करण्याचा प्रयत्न आजवर झाला नाही. परंतु आता महापालिका आयुक्तपदी आश्विनी भिडे या असल्यामुळे अभियंत्यांच्या बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप टाळणे तसेच आर्थिक व्यवहाराचा होणारे आरोप लक्षात घेता या बदल्या भविष्यात ऑनलाईन पध्दतीने केल्या जाण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑनलाईन पध्दतीने बदलीचे आदेश काढल्यास संबंधित अभियंत्यांने यापूर्वी कोणत्या विभागात किती वर्षे काम केलेले आहे, त्याची बदली कुठे कुठे झाली आहे तसेच कुठे करणे आवश्यक आहे, याची माहिती त्वरीत प्राप्त होणार आहे. (BMC Engineers Transfer Online)

Comments
Add Comment

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच