Maharashtra Weather Update : पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' १३ जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा इशारा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर कमी राहिल्यानंतर पुन्हा हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून १३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ( Rainfall Forecast)


कोकण विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, मात्र सर्वदूर पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ( Marathwada)



उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत सध्या कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ३ सप्टेंबरसाठी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात पावसाची मोठी तूट असल्याने पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Yellow Alert)


मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी मात्र सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.


विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Orange Alert)


दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप कायम असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (Monsoon)

Comments
Add Comment

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक