Shocking medical mystery : ३८ आठवड्यांची प्रेग्नंट अन् सीझरच्या वेळी गर्भात बाळच नाही! डॉक्टरांना धक्का, पोलिसांच्या तपासात उघड झाले 'हे' भयंकर सत्य

एका महिलेला ३८ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या हातात सोनोग्राफीचे रिपोर्ट होते, ज्यानुसार बाळ पूर्ण वाढलेले दिसत होते. डॉक्टरांनी सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून महिलेला प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया गृहात (OT) नेले. मात्र, सिझेरियन ऑपरेशनसाठी पोट उघडताच डॉक्टरांचे पाय खालील जमीन सरकली महिलेच्या गर्भाशयात बाळच नव्हते! बाळ गायब झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. परंतु, पोलिसांच्या तपासात जेव्हा या संपूर्ण प्रकरणामागील धक्कादायक सत्य समोर आले, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.



ही चक्रावणारी घटना पाकिस्तानमधील कराची शहरातून समोर आली आहे. २७ ऑगस्ट रोजी ही महिला कुटुंबीयांसह प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. तिने डॉक्टरांना ३८ आठवडे गरोदर असल्याचे सोनोग्राफी रिपोर्ट दाखवले. डॉक्टरांनी त्या कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक तपासणी करून सीझर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान पोटात बाळ आढळलेच नाही. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरांवर बाळ चोरल्याचा थेट आरोप करत गोंधळ घातल्याने तातडीने पोलिसांना बोलावावे लागले. पोलिसांनी प्रकरणाची सूत्रे हाती घेत सखोल चौकशी केली असता, हे बाळ चोरीचे नसून 'बोगस प्रेग्नन्सी'चे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले.


पोलीस तपासात उघड झाले की, लग्नाला तीन वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून या महिलेवर प्रचंड मानसिक दबाव होता. याच दबावाला बळी पडून तिने आपण गर्भवती असल्याचे खोटे नाटक रचले आणि ९ महिने सर्वांना अंधारात ठेवले. हे नाटक खरे वाटण्यासाठी तिने बनावट अल्ट्रासाऊंड रिपोर्ट्स तयार केले होते. या घटनेनंतर रुग्णालयाच्या निष्काळजीपणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेपूर्वी स्वतःचे अल्ट्रासाऊंड न करता केवळ पेशंटने आणलेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी सीझरचा निर्णय कसा घेतला, याचा तपास आता आरोग्य प्रशासन करत आहे.

Comments
Add Comment

Tibet Earthquake : तिबेटमध्ये रिश्टर स्केलवर ५.० तीव्रतेचा भूकंप

ल्हासा : तिबेटमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 नोंदवण्यात

Nepal climate change news : नेपाळमध्ये हवामान बदलाचा महाप्रलय : "प्रदूषण करणाऱ्या देशांनीच भरपाई द्यावी!" नेपाळची आक्रमक भूमिका

नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर आता राजकीय आणि हवामान न्यायाच्या (Climate Justice) संघर्षाला तोंड

Nepal Flood Disaster : मृतांचा आकडा १२०० पार, ४ हजारांहून अधिक जण बेपत्ता

काठमांडू : नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या विनाशकारी अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला असून, या

Trump Strait Hormuz : ‘होर्मुझ स्ट्रेट’ आता ‘ट्रम्प स्ट्रेट’? डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाने खळबळ

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझच्या

Nepal Flood 2026 : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील नागरिक बेपत्ता; नातेवाईकांच्या मदतीसाठी MMRC कडून राज्यव्यापी मोहीम

मुंबई : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याने महाराष्ट्रातील कुटुंबांची चिंता वाढली आहे.

US Iran war news : ‘मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका!’ अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला; प्रत्युत्तर म्हणून इराणकडून अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा

अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. मध्यपूर्वेत