Amravati Crime : अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात चाकूने हत्या; एकतर्फी प्रेमातून हत्याकांडाचा संशय

अमरावती : अमरावतीमध्ये एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हे भयंकर हत्याकांड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिवसाढवळ्या भरचौकात आरोपीने या तरुणीवर चाकूने वार केले असून ती जागीच मरण पावली. या घटनेमुळे अमरावती शहरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही आणखी माहिती आणि पुराव्यांची तपासले जात आहेत. (Amravati Crime)



समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील रवीनगर चौकात पावणे एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मानसिकतेतून आणि ब्रेकअपच्या संतापातून एका तरुणाने १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी शर्वरी गणेश हाडकेवर चाकूने सपासप वार करून तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. रवीनगर येथील गजबजलेल्या चौकात या प्रकारची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Amravati Crime)



आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून हत्या झालेल्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असून अलीकडेच तिने त्याच्याशी ब्रेकअप केल्याने तो प्रचंड संतापला होता. गुरुवारी दुपारी शर्वरी आपल्या दुचाकीने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात जात असताना, मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या नराधम आरोपीने तिचा पाठलाग केला. रवीनगर चौकात त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने शर्वरीच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर चाकूने अनेक वेळा वार केले. आपला जीव वाचवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. (Amravati Crime)



यादरम्यान झटापटीत आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळीच पडले. मात्र निर्दयी हल्लेखोराने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडून घटनास्थळावरून पळ काढला.​ घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला तातडीने बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून राजापेठ पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना झाली आहेत. (Amravati Crime)


Comments
Add Comment

FDA Festive Calendar : सण-उत्सवात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी 'एफडीए'कडून वार्षिक कॅलेंडर

सर्व धर्मीयांच्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘स्थायी आदेश’ जारी मुंबई :

Ahilyanagar Crime : धक्कादायक ! विहिरीत आढळले युवक-युवतीचे मृतदेह

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी

Shivpuri mysterious death 4 children : धबधब्यात पिकनिक अन् घरी परतताच भयंकर... एकामागून एक ४ मुलांचा रहस्यमय मृत्यू; शिवपुरीतील घटनेने खळबळ!

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरी (Shivpuri) जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी आणि अत्यंत रहस्यमय घटना समोर

Sawantwadi Express : 'सावंतवाडी एक्स्प्रेस'ला उपमुख्यमंत्री शिंदे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, मंत्री नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट; खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई :

Mumbai Crime : एसएनडीटी कॉलेजमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; नराधम कराटे प्रशिक्षक अटकेत

मुंबई : मुंबईतील माटुंगा येथील SNDT कॉलेजशी संबंधित एका कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Nitish Rajput bigg boss : 'बिग बॉस २०' मध्ये होणार युट्युबर नितीश राजपूतची एन्ट्री ? पाकिस्तानने ज्याच्यावर घातली होती बंदी, नक्की आहे तरी कोण ?

सलमान खानच्या सूत्रसंचालनाखाली सुरू होणाऱ्या 'बिग बॉस २०' या बहुचर्चित शोची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोची