Rahul Shewale : नेपाळमध्ये अडकलेले ५४ भारतीय सुखरूप मुंबईत दाखल; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ५४ भारतीय भाविक अखेर सुखरूप मुंबईत दाखल झाले. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.


यावेळी शिवसेनेचे सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाविकांचे स्वागत केले. मिठाई भरवून आणि गुलाबपुष्प देत शेवाळे यांनी भाविकांशी संवाद साधला. भाविकांनी महाराष्ट्र शासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांचे आभार मानले.



२२ ऑगस्टला कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेला हा ५४ जणांचा समूह महापुरामुळे सीमेवर अडकला होता. माहिती मिळताच राहुल शेवाळे यांनी भाविकांशी संपर्क साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे भाविकांना धीर दिला. महाराष्ट्र सरकार, भारतीय दूतावास आणि नेपाळ दूतावासाच्या समन्वयातून विशेष व्यवस्था करून भाविकांना काठमांडू येथे आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी विमानाने त्यांची सुखरूप मुंबईत घरवापसी झाली.



"माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने नेपाळमध्ये विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. महापुरामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना या कक्षाच्या माध्यमातून सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. ५४ भाविकांचा हा ग्रुप मुंबईत येईपर्यंत आम्ही सर्वजण त्यांच्या संपर्कात होतो. हा क्षण म्हणजे शिवसेनेचा समाजकार्याचा वसा अधोरेखित करणारा क्षण आहे"
- राहुल शेवाळे, शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार


"वास्तविक, इतक्या प्रलयंकारी महापुरातून आम्ही वाचलो, यासाठी ईश्वराचे आभार मानतो! आणि या कठीण प्रसंगात आमच्याशी संपर्क साधून आम्हाला धीर दिल्याबद्दल आणि परत मुंबईत येण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारची मदत केल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. आम्ही ५४ जण त्यांचे सदैव ऋणी राहू"
- संजय सावंत, भाविक

Comments
Add Comment

Tejas Express : गणेशोत्सवात तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना मिळणार उकडीचे मोदक; IRCTCचा खास उपक्रम

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या उत्सवी

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; सहभागासाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

मुंबई : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व

CM Devendra Fadnavis : पत्रकारांच्या आरोग्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार; विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर

मुंबई : सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळांमुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम

DJ Ban : १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा आणि आगामी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला असून गणेश मंडळे

Vidyanand Bapat Attack : ‘पोलिसांनी त्याला चौकीत बोलवावं आणि...; हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांची संतप्त प्रतिक्रिया

पुणे : पुण्यातील ‘डीजे मुक्त गणेशोत्सवा’साठी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर एका तरुणाने हल्ला केल्याची

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तनाचा आरोप, संतप्त जमावाने थेट शिक्षकाची कार पेटवली

Jalgaon Crime : खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करून तिच्याकडे अयोग्य मागणी केल्याचा प्रकार