Ahilyanagar Crime : दोघेही घरातून बेपत्ता... विहिरीजवळ सापडली चप्पल अन् दप्तर, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथे एका अल्पवयीन तरुणीचा आणि एका २० वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Ahilyanagar Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि २० वर्षीय वैभव भाऊसाहेब शिंगाडे या दोघांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. दोघेही घरातून बेपत्ता होते. कुटुंबीय व नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना 2 सप्टेंबर रोजी सकाळी गावाजवळील बसस्थानकापासून सुमारे 400 मीटर अंतरावरील विहिरीजवळ वैभवची चप्पल आणि वैष्णवीचे दप्तर आढळले. (Ahilyanagar Crime News)



मिरजगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद


दरम्यान घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरु केली. शोध घेत असताना विहिरीत तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळला. तिच्या अंगावर शालेय गणवेश होता. मृतदेह मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आला. धक्कादायक म्हणजे सायंकाळी त्याच विहिरीत वैभवचाही मृतदेह आढळून आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात (Mirajgaon Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत आठ जण अटकेत, लॅब असिस्टंट साळुंकेला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Shalarth ID Scam : सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात रोज नवे खुलासे होत आहेत. धुळ्यातील साक्री येथील न्यू

China Masters : किदाम्बी श्रीकांतची आगेकूच कायम, तन्वी शर्माचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन (चीन) : किदाम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर लाईला पराभूत करत चायना

ICC Women's Champions Trophy 2027 : पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले की, पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ ही

CM Devendra Fadnavis : पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन!

- २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती मुंबई :

Amravati Crime : अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात चाकूने हत्या; एकतर्फी प्रेमातून हत्याकांडाचा संशय

अमरावती : अमरावतीमध्ये एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना

FDA Festive Calendar : सण-उत्सवात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी 'एफडीए'कडून वार्षिक कॅलेंडर

सर्व धर्मीयांच्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘स्थायी आदेश’ जारी मुंबई :