BMC Expenditure Audit : महापालिका कार्यालय, विभागांमध्ये लाखो रुपयांच्या खर्चाचा स्वैराचार

- मागील एक वर्षांच्या खर्चाचे ऑडीट करा; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत विभाग कार्यालय तसेच विभाग कार्यालयांमार्फत ०५ ते ७५ लाखांपर्यंतच्या खर्चाचा स्वैराचार झाला असून अशाप्रकारे सुरु असलेली कामे त्वरीत थांबवा. या कामांमधून गैरप्रकार होत आहे. त्यामुळे मागील एक वर्षांत झालेल्या अशाप्रकारच्या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात यावे आणि यासर्व कामांचा दर्जा तपासण्याचे निर्देश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत. (BMC Expenditure Audit)



मुंबई महापालिका मलनि:सारण प्रचालन विभागाच्या माध्यमातून कलम ६२ व ७२ च्या आर्थिक बाबींशी निगडी सुधारीत तरतुदीनुसार रुपये पाच लाखांहून अधिक आणि ७५ लाखांपर्यंतच्या खर्चाच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला होता. यावर उबाठाचे शैलेश फणसे यांनी २ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समितीच्या सभेत एकूण ४० प्रस्तावांपैंकी २२ प्रस्ताव हे या ०५ ते ७५ लाखांपर्यंतचे आहेत. परंतु या प्रस्तावात अर्धवट माहिती आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी घाटकोपर येथे अशाचप्रकारे मंजुरीसाठी ठेवलेल्या कामांची पाहणी करण्यास गेलो असता त्यातील काही कामे सुरु आहेत तर काहींना अद्यापही सुरुवात झालेली नाही असे सांगण्यात आली. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी पक्षभेद वेगळे असू शकतील, पण मतभेद असू नये असे सांगत अशाप्रकारचे प्रस्ताव नियमांमध्ये यायला हवा असे सांगितले. (BMC Expenditure Audit)



यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ५ ते ७५ लाखांचा अमर्याद वापर होत आहे. काही अधिकारी व कंत्राटदार हे संगनमताने अशाप्रकारची कामे होत आहेत. सीडब्ल्यूसी कंत्राट पध्दत बंद करून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ई कोटेशन पध्दत सुरु करण्यात आली आहे. परंतु यामध्ये याद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चात स्वैराचार सुरु आहे. विभागाचे अधिकारी या खर्चासंदर्भात त्रोटक माहिती आणतात. त्यामुळे आपण वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने याबाबत कठोर पावले उचलावी लागतील. मागील टर्ममध्ये अशाप्रकारे ५४७४ कोटींचा खर्च झाला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना निवेदन देवून तसेच यापूर्वीचे आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पीय भाषणातील टिप्पणी जोडून या खर्चाला पायबंद घालण्याची मागणी केली. परंतु त्यानंतरही स्थायी समितीला अशाप्रकारचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या कामांद्वारे अधिकाराचा गैरवापर होत असून हे प्रकार बंद व्हावे. (BMC Expenditure Audit)


त्यामुळे करणारे कोण आणि लाभार्थी कोण याची आम्हाला पूर्ण कल्पना असून अशाप्रकारच्या कामांना पायबंद घालण्यासाठी मागील वर्षभरात अशाप्रकारे केलेल्या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात यावे तसेच त्या बांधकामांचा दर्जा तपासला जावा. तसेच जी कामे सुरु आहेत, ती त्वरीत थांबवा अशाप्रकारचे निर्देशही प्रभाकर शिंदे यांनी दिले. (BMC Expenditure Audit)

Comments
Add Comment

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच