- वॉकी टॉकी, हँड मेटल डिटेक्टर, बूम बॅरियर्सची खरेदी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतींमध्ये बसवण्यात आलेल्या ५६ सीसी टिव्ही कॅमेरांपैंकी तब्बल ३० कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे या मुख्यालयातील जुने कॅमेरे आता बदलून नव्याने एआय आधारीत ८७ नवीन कॅमेरे तसेच प्रबोधन नाट्यगृहासह इतर ठिकाणी एकूण १२७ सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये वॉकी टॉकी, हँड मेटल डिटेक्टर व बूम बॅरियर्सची उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या दोन प्रस्तावांना स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. (BMC Security System)
मुंबई महापालिकेच्या अंतर्गत विविध ठिकाणी सुरक्षा प्रणालीमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीकोनातून विविध ठिकाणी ४० सीसी टिव्ही कॅमेरे, १८० वॉकीटॉकी, १९८ हँड मेटल डिटेक्टर व ४५ बूम बॅरियर्सची आदींचा प्रस्ताव मंजुरीला आला असता काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी या वस्तूंचे रेट ऍनालेसीस झाले का असा सवाल करत गर्दीत डिटेक्शन होवू शकते का सवाल केला. तर भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी यापूर्वी ८७ कॅमेरा बसवण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यातच आता ४० एआय कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आणला. मग यासाठी स्वतंत्र प्रस्ताव का असा सवा करत तिवाना यांनी हे सर्व साहित्य कुठे वापरणार याचा कुठेही उल्लेख नसल्याचे सांगितले. (BMC Security System)
शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची ...
यावर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी प्रति सेट किती रुपये आहे, आणि प्रशासनाला हा दर रास्त कसा वाटतो असा सवाल केला तर भाजपच्या प्रिती सातम यांनी प्रस्तावात विभागाने संबंधित कंपनीचे काम समाधानकारक असल्याचा उल्लेख केला असल्याचा सांगत हे समाधानकारक काम कुठे केले? यांनी कुठे हे काम पाहिले असा सवाल करत महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालयांमध्ये किती हँड मेटल डिटेक्टर, वॉकीटॉकी, बूम बॅरियर्स किती आहेत याची माहिती द्यावी असे सांगितले. (BMC Security System)
तर डॉ सईदा खान यांनी सी सी टिव्ही कॅमेरांचे पुटेज एक महिन्यांऐवजी सहा महिन्यांपर्यंत राहावे अशी मागणी केली. तर श्रध्दा जाधव यांनी याचे अंदाजपत्रक कशाच्या आधारे बनवले असा सवाल करत याचे दरच नाही तर हे दर वाजवी कसे असा सवाल केला. यावर ४० कॅमेरांपैंकी १३ कॅमेरे हे एआय आधारीत आहेत त्यातील काही प्रबोधनकार नाट्यगृहात बसवले जाणार आहेत. त्यामुळे हे सर्व साहित्य कुठे उपलब्ध करून दिले जाणार आहे याची यादी आहे,असे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. (BMC Security System)
छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने मंत्री ...
मुख्यालयातील जुन्या इमारतीत ८७ कॅमेरांची नजर :
मुंबई महापालिका मुख्यालयात सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात ४१ डोम ए आय डोम कॅमेरा आणि ४४ ए आय बुलेट कॅमेरा तसेच २ पीटीझेड अशाप्रकारे ८७ सीसी टिव्ही कॅमेरांची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी विविध करांसह ३.७४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. याकरता सहोरा कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता या कॅमेरांचा डेटा एक वर्षांचा असावा अशी मागणी यशवंत किल्लेदार यांनी केला, तर हा डेटा किमान सहा महिन्यांचा असावा अशी मागणी डॉ सईदा खान आणि सभागृहनेते गणेश खणकर यांनी केला. तर तेजिंदर सिंग तिवाना यांनी यातील पीटीझेड कॅमेरा म्हण्जे काय असा सवाल करत प्रत्येक कॅमेरांची किंमत १५ ते २० हजार असताना प्रशासन हे कॅमेरे चौपट दराने खरेदी करत असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत मिनाक्षी पाटणकर आदींनी चर्चेत भाग घेतला. यामध्ये मुख्यालयातील जुन्या इमारतीत ५६ कॅमेरे असून त्यातील ३० कॅमेरे बंद आहेत. यांचे स्टोरेज कॅपासिटी ही ३० दिवसांची आहे. तर बुलेट कॅमेरा ८६ हजार रुपये तर पीटीझेड कॅमेरा हा १ लाख रुपयांना विकत घेतला जात आहे,असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. परंतु यापुढे सहा महिन्यांचे बॅकअप ठेवणारेच कॅमेरांची खरेदी केली जावी अशी सूचना सभागृहनेते गणेश खणकर यांनी केल्यांनतर हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. (BMC Security System)





