Chandrapur Crime News : रक्षाबंधनानिमित्त बहिणीसाठी केलेला मटणाचा बेत भावांच्या जीवावर बेतला

चंद्रपूर : रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या बहिणीसाठी केलेल्या मटणाच्या बेतातील उरलेल्या मटणावरून झालेला किरकोळ वाद रक्तरंजित ठरला. मटणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Chandrapur Crime News)


मिळालेल्या माहितीनुसार, रमेश श्रीराम बनकर (वय ५५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे. (Chandrapur Crime News)



रक्षाबंधनासाठी बहिणीच्या स्वागताला मटणाचा बेत :


रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण घरी आली होती. तिच्या स्वागतासाठी कुटुंबीयांनी सकाळी मटणाचा बेत केला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळी घरात उरलेल्या मटणावरून जगन आणि रमेश या दोन्ही भावांमध्ये वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही दारूच्या नशेत असल्याने किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद हळूहळू विकोपाला गेला. संतापाच्या भरात जगनने घरातील कुऱ्हाड हातात घेत रमेश यांच्यावर हल्ला केला. (Chandrapur Crime News)



मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीचे वार :


आरोपी जगनने रमेश यांच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने गंभीर वार केले. या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपी जगन बनकर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत आहेत. (Chandrapur Crime News)


किरकोळ घरगुती वादातून भावानेच भावाचा जीव घेतल्याने शंकरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रक्षाबंधनासारख्या भावंडांच्या नात्याचा सण नुकताच पार पडलेला असताना घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे. (Chandrapur Crime News)

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला