Mumbai News : पहाटे 5:17 ची लोकल, एकाकी तरुणी आणि चालत्या लोकलमध्ये ते कृत्य! पण शेवटच्या क्षणी असं काही घडलं की...

डहाणू रेल्वे स्थानकावरून पहाटेच्या सुमारास बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेमध्ये 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डब्यात तरुणी एकटी असल्याची संधी साधून एका अज्ञात इसमाने तिच्यावर हल्ला करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, तरुणीने प्रसंगावधान राखत केलेल्या धाडसी प्रतिकारामुळे मोठा अनर्थ टळला.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5.17 वाजता डहाणू स्थानकातून मेमू लोकल सुटली. यावेळी महिला डब्यात ही तरुणी एकटीच प्रवास करत होती. अंदाजे 27 ते 28 वर्षांचा एक अज्ञात इसम महिला डब्यात शिरला. त्याने सुरुवातीला गाडी कुठे पोहोचली आहे, अशी विचारणा करत तरुणीचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणी एकटी असल्याचे पाहून त्याने अचानक तिचा गळा दाबत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.



अचानक झालेल्या या हल्ल्याने तरुणी घाबरली नाही. तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी संशयिताच्या डोळ्यांत बोटे घालून त्याला मागे ढकलले आणि जोरात आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून लगतच्या डब्यातील प्रवासी मदतीसाठी धावून आले. प्रवाशांनी संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाणगाव स्थानकाजवळ झालेल्या झटापटीचा फायदा घेत संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.


घटनेनंतर तरुणीने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तत्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप स्पष्ट झालेली नाही.


पहाटेच्या वेळी महिला डब्यात घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जीवघेण्या परिस्थितीतही तरुणीने दाखवलेल्या धैर्याचे कौतुक होत आहे. या प्रकरणात रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला