मुंबई : राज्य शासनाने बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी पालघर येथील जव्हारच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याशिवाय पुण्याचे भूजल सर्वेक्षणचे आयुक्त गजानन बावणे यांची महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर येथील सहव्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महसूल व ग्रामीण विकास विभागातील इतर कनिष्ठ आणि परिवीक्षाधीन सनदी अधिकाऱ्यांच्याही प्रशासकीय सोयीनुसार विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ. अपूर्वा बासूर यांच्या रुपात सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवीन महिला मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्याने जिल्ह्याच्या विकासात्मक कामांना आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माला वनडे संघात स्थान देण्याबाबत काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित 2027 च्या विश्वचषकात खेळताना ...
कोणाची कुठे बदली?
- रवींद्र खेबुडकर (आयएएस २०१५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांची आयुक्त, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- गजेंद्र बावणे (आयएएस २०१६) आयुक्त, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पुणे यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. अपूर्वा बासुर (आयएएस २०२२) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- विशाल खत्री (आयएएस २०२२) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- दोनुरु अनन्या रेड्डी (आयएएस २०२४) अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नांदेड यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- पी. के. सिद्धार्थ रामकुमार (आयएएस २०२४) अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- कुश मोटवानी (आयएएस २०२४) अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा, वर्धा उपविभाग, वर्धा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- आकाश वर्मा (आयएएस २०२४) अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, वाशीम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- नंदला साईकिरण (आयएएस २०२४) अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंदिया यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा उपविभाग, भंडारा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- योगेश कुमार मीना (आयएएस २०२४) अधिसंख्य (Supernumerary) सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव उपविभाग, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- शिवांश सिंग (आयएएस २०२४) अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.