मुंबई : कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचा शुभारंभ ३ सप्टेंबर २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२.५० वाजता CSMT येथून उद्घाटनपर विशेष गाडी क्रमांक 01001 ला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. (Mumbai Sawantwadi Daily Express)
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 2019 मध्ये पाकिस्तानच्या F-16 लढाऊ ...
कोणत्या स्थानकांवर थांबणार?
उद्घाटनपर विशेष गाडी CSMT येथून रवाना झाल्यानंतर दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. (Mumbai Sawantwadi Daily Express)
गाडीमध्ये कोणते डबे असतील?
या एक्सप्रेसमध्ये १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ४ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचा समावेश असेल. (Mumbai Sawantwadi Daily Express)
पुणे : पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडित यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
कोकण पर्यटनाला मिळणार चालना :
CSMT-सावंतवाडी रोड दैनंदिन एक्सप्रेसमुळे मुंबई आणि दक्षिण कोकणातील प्रवाशांना नियमित रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. सावंतवाडी, आंबोली, तारकर्ली तसेच गोवा सीमेवरील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे. दैनंदिन सेवा सुरू झाल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादरहून कोकणाकडे जाणाऱ्या अन्य गाड्यांवरील गर्दी कमी होण्यासही मदत होऊ शकते. (Mumbai Sawantwadi Daily Express)
दरम्यान, या गाडीच्या नियमित सेवेचे वेळापत्रक आणि इतर तपशील नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने ही सेवा कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. (Mumbai Sawantwadi Daily Express)