नाशिक : त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावरील सातपूर गावाच्या पुढे खासगी महाविद्यालयाच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत सातपूर परिसरात अपघाताचा हा दुसरा बळी ठरला आहे. (Nashik Bus Bike Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर-नाशिक रोडवरील सातपूर गावाच्या पुढे हॉटेल शौर्यवाडा परिसरातही काम सुरू आहे. या कामासाठी खोदण्यात आलेली माती रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Nashik Bus Bike Accident)
मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना मिळणार प्रशिक्षण मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती ...
दरम्यान, एमएच १५ जीजी १८९२ क्रमांकाची दुचाकी या परिसरातून जात असताना रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घसरली. त्याचवेळी मागून येणाऱ्या संदीप फाऊंडेशनच्या खासगी महाविद्यालयाच्या एमएच १५ एचएच ६०७१ क्रमांकाच्या बसने दुचाकीला धडक दिली. (Nashik Bus Bike Accident)
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रतीक्षा आचारी-इंफाळे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Nashik Bus Bike Accident)
- मागील एक वर्षांच्या खर्चाचे ऑडीट करा; स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत विभाग कार्यालय तसेच विभाग कार्यालयांमार्फत ...
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. रस्त्यावर आलेली माती आणि सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Bus Bike Accident)




