Nashik : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून तुम्ही परिसर खराब करत असाल तर थांबा कारण आता तुमच्यासाठीच महत्त्वाची बातमी आहे. शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) व्यवस्थापनाच्या घनकचरा नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना आता थेट १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. फक्त एवढंच नाही तर नियमांचे उल्लंघन वारंवार करणाऱ्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल करून पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त मनीषा खत्री (Municipal Commissioner Manisha Khatri) यांनी दिला आहे. (Nashik News)
Nashik MHADA Scam : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात अखेर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात बेकायदेशीरपणे काम केल्याचा ...
अवर्गीकृत कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकल्यास कारवाई
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (Ministry of Environment, Forest and Climate Change) अधिसूचित केलेल्या 'घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६'ची (Solid Waste Management Rules, 2016) काटेकोर अंमलबजावणीसाठी महापालिकेने ही सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांसह व्यापारी, गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था आणि विविध आस्थापनांना कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. महत्त्वाचे म्हणजे ओला आणि सुखा कचरा फक्त एवढेच वर्गीकरण नसेल. घरगुती तसेच व्यावसायिक स्वरूपात निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी कचरा अशा चार स्वतंत्र प्रकारांत वर्गीकृत करूनच महापालिकेकडे (Nashik Municipal Corporation) देणे आवश्यक आहे. सोबतच अवर्गीकृत कचरा (Unclassified waste) सार्वजनिक ठिकाणी फेकणे वा थेट घंटागाडीत देणे हा नियमभंग मानला जाणार आहे. (Nashik News)
Nashik : पावसाने काहीशी उघडीप घेतली असली, तरी नाशिक शहरात सध्या ऊन-पावसाचा खेळ नागरिकांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे. बदलते वातावरण, ठिकठिकाणी ...
सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांवरही कारवाई
सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा भंग केल्यास २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पानमसाला किंवा गुटखा खाऊन थुंकणे तसेच धूम्रपान, ई-सिगारेटचा वापर करणे यावरही कारवाई होणार आहे.






