Nashik : द्वारका जंक्शनच्या कामाला वेग ! मुंबई-धुळे मार्ग खुला, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

Nashik : नाशिक शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या द्वारका जंक्शनवरील कामाला आता वेग आला आहे. मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, उर्वरित रस्त्याचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड पूर्ण १३.५ मीटर रुंदीचा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे द्वारका जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Authority Commissioner Shekhar Singh) यांनी याबाबत माहिती दिली. द्वारका जंक्शन येथील सुरू असलेल्या कामाची ३१ ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील आढाव्यावेळी देण्यात आलेल्या मुदतीनुसार मुंबई-धुळे बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची नोंद पाहणीदरम्यान घेण्यात आली. मात्र, उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या एका छोट्या भागातील स्लॅबचे काम अद्याप सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचा उर्वरित भागही वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. त्यामुळे स्लॅबचे उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्यात आले आहेत.(Nashik News)



पुणे मार्गावरील सर्व्हिस रोड १३.५ मीटर रुंद होणार


द्वारका जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा सर्व्हिस रोड पूर्ण १३.५ मीटर रुंदीचा विकसित करण्यात येणार आहे. या रुंदीकरणामुळे या मार्गाची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असून, जंक्शन परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. द्वारका जंक्शनवरील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा होण्याची श क्यता आहे. मात्र, काम सुरू असताना नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. (Nashik News)



वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ


दरम्यान, पाहणीदरम्यान द्वारका जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थापनाचाही आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहतूक नियमनाचे आव्हान निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यासाठी अतिरिक्त वाहतूक वॉर्डनची नियुक्ती करून त्यांचा प्रभावीपणे वापर करण्याच्या सूचना संबंधित पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. (Nashik News)



वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याच्या सूचना


द्वारका जंक्शनवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक पोलिसांशी सातत्याने समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक वाहतूक नियमन, नागरिकांची सुरक्षितता आणि इतर उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई-धुळे मार्ग खुला झाल्यानंतर आता उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे द्वारका जंक्शनसह नाशिकरोडच्या रस्ता रुंदीकरणाचे काम कधी पूर्ण होणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला