Nashik MHADA Scam : नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई, मंडळ अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांचे निलंबन

Nashik MHADA Scam : नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात अखेर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात बेकायदेशीरपणे काम केल्याचा ठपका ठेवत एका मंडळ अधिकाऱ्यासह तीन तत्कालीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नाशिकच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील आणखी कोणावर कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.



एसआयटी चौकशीत दोष सिद्ध


म्हसरूळ, गंगापूर आणि नाशिक शहर-१ या भागांतील तत्कालीन तलाठी आणि अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या एसआयटीकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कार्यालयीन दप्तराची सखोल तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची छाननी आणि चौकशीदरम्यान संबंधित अधिकारी दोषी आढळून आल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. (Nashik MHADA Scam)



कागदोपत्री फेरफार केल्याचा आरोप


नियमांनुसार, एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांधकाम असलेल्या काही गृहप्रकल्पांमध्ये ठरावीक घरे म्हाडाला हस्तांतरित करणे विकासकांसाठी बंधनकारक असते. ही घरे म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना तुलनेने कमी दरात उपलब्ध करून दिली जातात. मात्र, नाशिकमधील या प्रकरणात एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर बांधकाम झालेले असतानाही कागदोपत्री फेरफार करून प्रकल्पाचे क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. या फेरफारामुळे संबंधित प्रकल्प म्हाडाच्या नियमांच्या कक्षेबाहेर दाखवण्यात आला आणि म्हाडाला मिळणारी घरे हडप करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. (Nashik MHADA Scam)



बांधकाम व्यावसायिकांसह अधिकाऱ्यांवरही गुन्हे


या प्रकरणात यापूर्वीच अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांसह शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसआयटीच्या तपासातून संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित बेकायदेशीर कामांचा उलगडा झाल्यानंतर आता प्रशासनाने निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणत्या अधिकारी किंवा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला