Thursday, September 3, 2026

PM Modi On Indian Avocado : पंतप्रधान मोदींकडूनही ‘इंडियन अवोकॅडो’चं कौतुक; जाणून घ्या या फळाचे भन्नाट फायदे

PM Modi On Indian Avocado : पंतप्रधान मोदींकडूनही ‘इंडियन अवोकॅडो’चं कौतुक; जाणून घ्या या फळाचे भन्नाट फायदे

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत अवोकॅडो या फळाची लोकप्रियता भारतात झपाट्याने वाढताना दिसत आहे. टोस्ट, डिप्स तसेच विविध पदार्थांमध्ये अवोकॅडोचा वापर केला जातो. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘इंडियन अवोकॅडो’चे कौतुक केले आहे. या फळाच्या पौष्टिक गुणधर्मांसोबतच देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अवोकॅडोची शेती कशी उपयुक्त ठरत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (PM Modi On Avocado)

‘इंडियन अवोकॅडो’ची वाढती लोकप्रियता :

२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओसोबत त्यांनी “Indian avocados are clearly getting more popular” असे कॅप्शन दिले. यामध्ये त्यांनी भारतात अवोकॅडोची वाढती मागणी आणि लोकप्रियतेचा उल्लेख केला.(PM Modi On Avocado)

काही वर्षांपूर्वी भारतात फारच कमी लोकांना या फळाची माहिती होती. त्यामुळे त्याची मागणी आणि बाजारातील किंमतही तुलनेने कमी होती. मात्र, आता आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांमध्ये अवोकॅडो लोकप्रिय होत असून, रेस्टॉरंट्सपासून घरातील डायनिंग टेबलपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. (PM Modi On Avocado)

अवोकॅडो आरोग्यासाठी किती फायदेशीर?

आहारतज्ज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. पूनम दुनेजा यांच्या मते, अवोकॅडो हे पौष्टिक घटकांनी समृद्ध फळ आहे. त्यामध्ये विविध अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक आढळतात. अवोकॅडोमध्ये असलेले पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तसेच पोट भरल्याची भावना दीर्घकाळ राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय मेंदूचे आरोग्य, स्मरणशक्ती आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही त्यातील पोषक घटक उपयुक्त ठरू शकतात. (PM Modi On Avocado)

मात्र, कोणतेही एक फळ सर्व आजारांपासून संरक्षण देते असा दावा करता येत नाही. अवोकॅडोचा आहारात समावेश करताना एकूण आहार संतुलित असणे महत्त्वाचे आहे. (PM Modi On Avocado)

अवोकॅडोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ :

पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशातील खरपा येथील वरदराज नावाच्या शेतकऱ्याचे उदाहरण दिले. ते अनेक वर्षांपासून टोमॅटो आणि केळीची शेती करत होते. एका मित्राच्या शेतात अवोकॅडोची लागवड पाहिल्यानंतर त्यांनी या पिकाची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. यूट्यूबसह उपलब्ध माहिती आणि वैज्ञानिक मार्गदर्शनाच्या मदतीने त्यांनी अवोकॅडोची लागवड सुरू केली. त्यानंतर त्यांनी सुमारे चार टन अवोकॅडोचे उत्पादन घेतले आणि स्थानिक दुकानांना थेट विक्री सुरू केली. (PM Modi On Avocado)

पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसार, नवीन पीक, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि थेट मार्केटिंग यामुळे या शेतकऱ्याच्या छोट्या शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा बदल झाला आहे.

‘टोस्टची चव’ आणि शेतकऱ्यांची कमाईही वाढली!

अवोकॅडो म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर मोठी शहरे आणि रेस्टॉरंट्स येतात. मात्र, आता हेच फळ भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन ठरत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. देशातच उत्पादित होणाऱ्या अवोकॅडोमुळे ग्राहकांच्या आहारात पौष्टिक पर्यायाची भर पडत आहे आणि त्याचवेळी शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठही उपलब्ध होत आहे. (PM Modi On Avocado)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >