Pune Traffic : पुणेकरांनो, बसने प्रवास करत असाल तर लक्ष द्या! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले















पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे PMPMLच्या बससेवेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी बस स्थानके आणि मार्गांचे नियोजन केले आहे. हे बदल 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी लागू राहणार आहेत. (Dahi handi)

5 सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर मार्ग क्रमांक 17 (नऱ्हेगाव-शिवाजीनगर) आणि मार्ग क्रमांक 50 (शनिवारवाडा-सिंहगड) या बस सारसबाग येथून सुटणार आहेत. तर मार्ग क्रमांक 113 (अ. ब. चौक-सांगवी) या मार्गावरील बस मनपा नदीकाठ स्थानकावरून धावणार आहेत.



याशिवाय मार्ग क्रमांक 8, 9, 57, 81, 94, 108, 143, 144 आणि 283 या बस डेक्कन जिमखाना, मनपा भवन आणि गाडीतळ (जुना बाजार) मार्गे धावणार आहेत. ( Dahi Handi Festival 2026)

मार्ग क्रमांक 2, 11, 13, 21, 37, 38 तसेच रातराणी-1 या बस पुण्याकडे येताना जे. एम. रोड, डेक्कन आणि टिळक रोडमार्गे धावतील. मात्र, स्वारगेटच्या दिशेने जाताना या बस नेहमीप्रमाणे बाजीराव रोडमार्गे धावणार आहेत.

दरम्यान, मार्ग क्रमांक 7, 68 आणि 202 या बस 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर स्वारगेट आणि टिळक रोडमार्गे धावणार आहेत. ( Dahi Handi Festival)

5 सप्टेंबरला 'हे' दोन मार्ग पूर्णपणे बंद


स्वारगेट आगाराकडून चालवले जाणारे मार्ग क्रमांक 3 आणि 6 हे शनिवार, 5 सप्टेंबर रोजी दिवसभरासाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी बससेवेचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे.

दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतूक व्यवस्थेतील बदलांनुसार काही बस मार्गांना तात्पुरते वळसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी आपल्या बस मार्गाची माहिती घेऊन पर्यायी स्थानकांचा वापर करावा, असे आवाहन PMPML प्रशासनाने केले आहे.

 






Comments
Add Comment

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Nashik Maha Goda Aarti: रामकुंडावर 31 ऑक्टोबरला केली जाणार ‘महा गोदा आरती’, नाशिक जिल्ह्यातील गावकरी घेणार सहभाग

नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष