मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील EatClub Brands Private Limited या खाद्य आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत निर्धारित नियम आणि स्वच्छता निकषांचे उल्लंघन आढळून आल्यानंतर संबंधित आस्थापनेचा FSSAI अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. (EatClub Brands FSSAI License Suspended)
रॉयल पाम्स येथील शॉपिंग व्हिलेज आर्ट्स अँड क्राफ्ट कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक १४, १५ आणि १६ येथे असलेल्या या आस्थापनेची FDAच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि अन्न हाताळणीशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. (EatClub Brands FSSAI License Suspended)
साठवणूक आणि स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी :
तपासणीदरम्यान अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वस्तू ठेवण्यासाठी योग्य साठवणूक व्यवस्था नसल्याचे आढळले. तसेच FSSAI परवाना दर्शनी ठिकाणी प्रदर्शित केलेला नव्हता. कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याच्या सुविधा आणि इतर स्वच्छता व्यवस्था समाधानकारक नसल्याचेही FDAच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित आवश्यक नोंदीही उपलब्ध नसल्याचे समोर आले. (EatClub Brands FSSAI License Suspended)
चंदीगड : हरियाणा सरकारच्या विविध विभाग आणि संस्थांशी संबंधित कथित ₹504 कोटींच्या IDFC First Bank घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) बुधवारी तिसरे ...
किचनमध्ये कीटक प्रतिबंधक उपायांचा अभाव :
किचन आणि इतर भागांमध्ये पुरेशी प्रकाशयोजना नसल्याचे तपासणीत आढळले. मागील दरवाजातून कीटक आणि उंदरांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच अन्न तयार करण्यापूर्वी कच्च्या मालाची योग्य पद्धतीने स्वच्छता केली जात नसल्याचे आढळले. कच्च्या मालाची अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तपासणीही केली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले. (EatClub Brands FSSAI License Suspended)
कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साहित्यही नव्हते :
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ॲप्रॉन, हातमोजे, हेडगिअर आणि शू कव्हर यांसारखे आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीशी संबंधित कागदपत्रांमध्येही त्रुटी असल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना आवश्यक Food Safety Training दिल्याची व्यवस्था आणि उत्पादन प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक तज्ज्ञ व्यक्ती तपासणीवेळी उपलब्ध नसल्याचेही समोर आले. (EatClub Brands FSSAI License Suspended)
पुणे : पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडित यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
परवान्यात नसलेली उत्पादने विक्रीसाठी :
FDAच्या तपासणीत आणखी एक बाब समोर आली. आस्थापनेच्या मूळ FSSAI परवान्यात नमूद नसलेली आईस्क्रीम आणि कार्बोनेटेड बेव्हरेजेस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा किंवा त्यासंबंधीच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या सर्व गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभागाने EatClub Brands Private Limitedचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याची कारवाई केली आहे. (EatClub Brands FSSAI License Suspended)






