रायगड : कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायत हद्दीतील धनगरवाडी आणि तापकीरवाडी परिसरात सुरू असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या धरण बांधकाम प्रकल्पातील ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून प्रकल्पाच्या सुमारे ६५ एकर परिसरात खोदकाम सुरू असून, वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना हादरे बसत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी कर्जत पोलीस ठाण्यात सामूहिक लेखी तक्रार दाखल करून ब्लास्टिंग तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे.
मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ५४ भारतीय भाविक अखेर सुखरूप मुंबईत दाखल झाले. गुरुवारी सायंकाळी ...
ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, परिसरातील घरांना जोरदार हादरे बसले. ब्लास्टिंगवेळी वापरण्यात येणाऱ्या रबर मॅटचा मोठा तुकडा तब्बल दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत उडून गेल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रकल्प परिसरात रात्री-अपरात्रीही ब्लास्टिंग केले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अचानक होणाऱ्या स्फोटांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भविष्यात ब्लास्टिंगमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
बंगळूर : पोलीस उपआयुक्त (इलेक्ट्रॉनिक सिटी विभाग) नारायण एम. यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बंगळूर ...
ब्लास्टिंग तातडीने बंद करून संपूर्ण चौकशी करावी, सुरक्षेचे कठोर नियम लागू करावेत आणि ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सहकुटुंब बांधकामस्थळी जाऊन ठिय्या आंदोलन करून काम बंद पाडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.