Nashik : मुक्त विद्यापीठाच्या १३ विद्यार्थ्यांची शिक्षण सेवकपदी निवड

Nashik : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) दत्तक घेतलेल्या घनशेत (ता. पेठ) गावातील १३ विद्यार्थ्यांची 'पवित्र पोर्टल'च्या माध्यमातून शिक्षणसेवकपदी निवड झाली. हे सर्व विद्यार्थी विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू झालेल्या घनशेत करिअर अकॅडमीचे आहेत. निवड झालेल्यांमध्ये खुशाल जयराम महाले (प्राथमिक शिक्षक नाशिक, पेसा), ज्ञानेश्वर गणपत गावित (कला शिक्षक मुंबई महानगरपालिका), कु. मोनाली यादव गावित (प्राथमिक शिक्षक जि.प. नाशिक), सविता लहू भोये (प्राथमिक शिक्षक जि.प. सातारा), भगीरथ पंढरीनाथ टोपले (प्राथमिक शिक्षक जि.प. नाशिक), रोहिणी जनार्दन भोये (प्राथमिक शिक्षक जि.प. कोल्हापूर), महेंद्र पंढरीनाथ चौधरी (प्राथमिक शिक्षक जि.प. नाशिक), गोदावरी भास्कर भोये (प्राथमिक शिक्षक जि.प. कोल्हापूर), विजय रमेश भोये (प्राथमिक शिक्षक जि.प. पालघर), सुधाकर वामन जाधव (प्राथमिक शिक्षक जि.प. रायगड), कु. माधुरी दिलीप चौधरी (प्राथमिक शिक्षक जि.प. सांगली), उत्तम ज्ञानेश्वर भोये (प्राथमिक शिक्षक जि.प. सातारा) आणि कु. महेश शांताराम लहारे (प्राथमिक शिक्षक जि.प. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. या यशाबद्दल कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (Nashik News)



घनशेतमध्ये शैक्षणिक चळवळीला बळ


कोरोना काळात सतीश गावित यांनी स्पर्धा परीक्षांसाठी तरुणांनी एकत्र येण्याची संकल्पना मांडली. मनोज सीताड, जीवन चौधरी, भगीरथ टोपले व दामोदर टोपले यांनी साथ दिली. मुक्त विद्यापीठाने संगणक व ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याने ही चळवळ विस्तारली. कोरोनानंतर गावातील २७ तरुण-तरुणींची विविध शासकीय सेवांसाठी निवड झाली आहे, अशी माहिती ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे यांनी दिली.

Comments
Add Comment

नेपाळ महापूर : चिखलात अडकलेल्या जिवांना वाचवण्यासाठी ५०० तज्ज्ञांचा व्हॉट्सॲप ग्रुप ठरतोय 'संजीवनी'!

नेपाळमधील त्रिशुली खोऱ्यात निसर्गाने घडवून आणलेल्या भीषण विनाशकानंतर एकीकडे सर्व यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत

Nashik News : जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी १५ शिक्षकांची निवड, ४३ प्रस्तावांतून उत्कृष्ट कार्याची दखल

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक

swami vivekanand vidyamandir news : स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात लिओ क्लबची स्थापना! विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना मिळणार वाव

वाडा : वार्ताहर  विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून

Dhule : विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीला मालमोटारीची समोरासमोर धडक, तब्बल ३० विद्यार्थी जखमी

Dhule : धुळ्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. मानव विकास योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या

Nashik : विसापूर आश्रमशाळेतील ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, पालकांकडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातुन खळबळजनक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा