मुंबई : भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या घडामोडींमध्ये रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना BCCI सचिव देवजित सैकिया यांनी काही प्रमाणात पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी मुंबईत BCCIची महत्त्वाची Review Meeting पार पडली. या बैठकीत भारतीय संघाची अलीकडील कामगिरी, खेळाडूंच्या दुखापती, आगामी मालिका आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी यावर चर्चा करण्यात आली.
हवामानातील सततच्या बदलांमुळे संपूर्ण जगासह भारताची चिंता वाढली आहे. प्रशांत महासागरात वेगाने वाढत असलेल्या तापमानामुळे आणि सक्रिय झालेल्या 'एल ...
या बैठकीला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, Test आणि ODI कर्णधार शुभमन गिल, T20I कर्णधार श्रेयस अय्यर, VVS लक्ष्मण आणि BCCI सचिव देवजित सैकिया उपस्थित होते. मात्र मुख्य निवडकर्ता अजित आगरकर बैठकीला उपस्थित नव्हते. बैठक अल्प सूचनेवर बोलावण्यात आली होती आणि आगरकर शहराबाहेर असल्याने ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. ज्या ठिकाणी ते होते, तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याने ते ऑनलाइनही सहभागी होऊ शकले नाहीत, अशी माहिती सैकिया यांनी दिली.
बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पिशिन जिल्ह्यातील ...
आगरकर बैठकीला नसल्याने त्यांच्या Chief Selector पदाच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या बैठकीत निवड समिती किंवा अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आगरकर यांची हकालपट्टी किंवा त्यांचा कार्यकाळ संपवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, रोहित शर्माच्या भवितव्याबाबत सैकिया यांची प्रतिक्रिया चर्चेत आली. रोहित सध्या चांगला खेळत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे 2027 एकदिवसीय विश्वचषकच्या पार्श्वभूमीवर रोहितसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे. मात्र BCCIने रोहितचे विश्वचषकामधील स्थान अद्याप अधिकृतपणे निश्चित केलेले नाही.
दुबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने आणखी एक विक्रम रचला आहे. तिने भारताची माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकत महिला आंतरराष्ट्रीय ...
बैठकीत पुढील SENA दौऱ्यांसाठी खेळाडूंना पुरेसा आराम, acclimatisation आणि गरजेनुसार सराव सामने देण्याच्या रणनीतीवरही चर्चा झाली. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सर्वोत्तम टीम कॉम्बिनेशन तयार करण्यावर BCCIचा भर राहणार आहे.





