नवी दिल्ली : एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने 4 ऑगस्ट रोजी झालेल्या एअर इंडियाच्या फुकेट-दिल्ली फ्लाइटशी संबंधित घटनेचा प्राथमिक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार फुकेटहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ए१२३७९ या फ्लाइटच्या को-पायलटची ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात एएआयबीच्या प्राथमिक अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे.
एएआयबीच्या प्राथमिक अहवालानुसार, विमानातील फ्लाइट-कंट्रोल सिस्टीमने तिन्ही हायड्रॉलिक सिस्टीममध्ये दाब कमी झाल्याचे शोधून काढले होते. या घटनेशी संबंधित तांत्रिक तसेच इतर सर्व बाबींची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या घटनेचा अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचे एएआयबीने स्पष्ट केले आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘मुंबई-अँटवर्प’ आर्थिक भागीदारी विकसित करण्याचा प्रस्ताव मुंबई : भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा शुल्क, ...
ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली होती. भुवनेश्वरजवळ उड्डाण करत असताना विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आले होते. या प्रकारामुळे विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांना दुखापत झाली होती. विमानात १३७ प्रवासी आणि ८ क्रू सदस्य असे एकूण १४५ जण प्रवास करत होते. अपघातानंतर विमानाची काही छायाचित्रेही समोर आली होती. विमानाने काही मिनिटे हेलकावे घेतल्याने त्याला तडे गेल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच एका प्रवाशाच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला स्ट्रेचरवरून विमानतळाबाहेर नेण्यात आले होते.
एएआयबीच्या अहवालात विमानातील पायलट-इन-कमांडच्या कन्फर्मेटरी ड्रग टेस्टचा निकाल पॉझिटिव्ह आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बाबीला गंभीर चिंतेचा विषय मानत एएआयबीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएकडे प्राधान्याने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पायलटच्या ड्रग टेस्टचा निकाल आणि विमान अचानक खाली येण्याच्या घटनेचा काही संबंध होता का, याचाही तपास केला जात आहे.
मुंबई : मुंबईच्या अग्रिपाडा परिसरात पतीने पत्नीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात ...
उल्लेखनीय म्हणजे, या घटनेत 20 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर जखमी झाले होते. एअर इंडियाने सुरुवातीला विमानाची उंची कमी होण्यामागे टर्ब्युलन्स (हवेचे झोत) कारणीभूत असल्याचे सांगितले होते. मात्र, विमान बनवणाऱ्या कंपनीच्या रिपोर्टमधून समोर आले की, विमानाच्या ग्रीन, ब्ल्यू आणि यलो सिस्टीममध्ये हायड्रॉलिक प्रेशरच्या समस्यांमुळे जवळपास चार सेकंदांसाठी एलिव्हेटर आणि एलिरॉन कंट्रोल काम करत नव्हते.