Nepal Car Accident : नेपाळमध्ये फेवा तलावात कार कोसळून अपघात; दोन भारतीयांचा मृत्यू, दोघे जखमी

पोखरा : नेपाळमधील पोखरा येथे शुक्रवारी पहाटे एक कार फेवा तलावात कोसळल्याने अपघात घडला. या अपघातात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. (Nepal Car Accident)


गंडकी प्रांत पोलीस कार्यालयाचे प्रमुख जितेंद्र बी.सी. यांनी सांगितले की, बिहारच्या नोंदणी क्रमांकाची ही कार पहाटे सुमारे 4:50 वाजता तलावात कोसळली. मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल येथील 26 वर्षीय नवदीप कुमार यादव अशी झाली आहे. दुसऱ्या मृत भारतीय नागरिकाची ओळख अद्याप पटलेली नाही. (Nepal Car Accident)



जखमी भारतीय नागरिकांची ओळख रक्सौल येथील 27 वर्षीय अनमोल कुमार यादव आणि 33 वर्षीय सूरज यादव अशी झाली आहे. दोघांनाही तलावातून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी गंडकी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. (Nepal Car Accident)


पोलिसांनी सांगितले की, हा अपघात पोखरा-18 मधील गौरीचौतारा वळणाजवळ झाला. सेदीहून तलावाच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर कार तलावात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य करण्यासाठी सुमारे दोन डझन सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. क्रेनच्या मदतीने कार तलावातून बाहेर काढण्यात आली.



माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही मृतांना पाण्यातून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून पोखरा अकादमी ऑफ हेल्थ सायन्सेस येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या अपघाताची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. (Nepal Car Accident)

Comments
Add Comment

Mohan Bhagwat Britain Visit : सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्यात ‘लोकसंवादा’वर भर

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 ते 7 सप्टेंबरदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. संघाचे

Giorgia Meloni : मेलोनी ठरल्या युद्धोत्तर इटलीतील सर्वाधिक काळ पंतप्रधान; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

इटली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देशाच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात सलग सर्वाधिक काळ

Sonu Sood : "नेपाळला या अन् मदत करा!"; 'सेल्फ मार्केटिंग'चा आरोप करणाऱ्या ट्रोलर्सना सोनू सूदचे सडेतोड उत्तर

काठमांडू : नेपाळमधील त्रिशुली खोऱ्यात आलेल्या विनाशकारी महापुराने हाहाकार उडवला असून १,२०० हून अधिक नागरिकांचा

नेपाळ महापूर : चिखलात अडकलेल्या जिवांना वाचवण्यासाठी ५०० तज्ज्ञांचा व्हॉट्सॲप ग्रुप ठरतोय 'संजीवनी'!

नेपाळमधील त्रिशुली खोऱ्यात निसर्गाने घडवून आणलेल्या भीषण विनाशकानंतर एकीकडे सर्व यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत

A second life : अंधार, चिखल अन् 'हरे कृष्ण'चा जप! बोगद्यात १० दिवस मृत्यूशी झुंज; नेपाळमधील 'त्या' इंजिनियर्सचा चमत्कारिक पुनर्जन्म

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर एक थक्क करणारा चमत्कार समोर आला आहे. त्रिशुली-३ ए जलविद्युत

Baloch Liberation Army : बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलांवर मोठा हल्ला; बीएलएचा १८ जवान ठार केल्याचा दावा

बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाल्याने परिसरात तणाव