Ahilyanagar : पुण्यातील तरुणाचं अपहरण करून उत्तर प्रदेशला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला ! समृद्धी महामार्गावर 3 किमी सिनेस्टाईल पाठलाग

Ahilyanagar : पुण्यातून २४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार समृद्धी महामार्गावर उघडकीस आला आहे. मात्र, महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा हा कट वेळीच उधळून लावण्यात आला. संशयित कारचा तब्बल ३ किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी कार अडवली आणि अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. या कारवाईत एका तरुणीसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


पुण्यातील चिखली परिसरातून अर्शद शकील अहमद सिद्दीकी या २४ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) समृद्धी महामार्गाच्या कंट्रोल रूमला दिली होती. संशयित आरोपी अर्टिगा कारमधून पीडित तरुणाला घेऊन सिन्नरच्या दिशेने पुढे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित कारचा क्रमांक यूपी ९० एई ९३७५ असा आहे. ही माहिती मिळताच बाभळेश्वर विभागातील महामार्ग पोलिसांनी (Highway Police of the Babhaleshwar division)तातडीने हालचाली सुरू केल्या. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ५३२ ते ५०२ दरम्यान नाकाबंदी करण्यात आली, तसेच संशयित वाहनाच्या शोधासाठी गस्त वाढवण्यात आली. गस्तीदरम्यान चॅनल क्रमांक ५२३ जवळ पोलिसांना संशयित अर्टिगा कार भरधाव वेगाने जाताना आढळली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कारचा पाठलाग सुरू केला. कार चालकाने वेग वाढवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनीही पाठलाग कायम ठेवला. तब्बल ३ किलोमीटरपर्यंत हा थरारक पाठलाग सुरू राहिला. अखेर चॅनल क्रमांक ५२० जवळ पोलिसांनी शिताफीने संशयित कारला घेराव घातला आणि कार थांबवण्यात पोलिसांना यश आले.



कारमध्ये तरुणासह सहा जण ताब्यात


कार थांबवल्यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली. यावेळी अपहरण करण्यात आलेला अर्शद सिद्दीकी हा तरुण कारमध्ये आढळून आला. त्याच्यासोबत असलेल्या सर्व सहा संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले सर्व संशयित उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रहिवासी आहेत. मोहम्मद अन्वर सिद्दीकी, निजामुद्दीन सिद्दीकी, फाजिल हुसेन सिद्दीकी, मोहम्मद साहिल सिद्दीकी, मोहम्मद सिद्दीकी, इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणासह सर्व सहा आरोपी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली अर्टिगा कार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमा केली आहे. दरम्यान, पुढील कायदेशीर कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक आरोपींचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले आहे.



अपहरणामागचं नेमकं कारण काय ?


दरम्यान, २४ वर्षीय तरुणाचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींचा तरुणाशी नेमका काय संबंध होता, त्याला उत्तर प्रदेशात का नेले जात होते आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि त्यानंतर केलेला ३ किलोमीटरचा पाठलाग यामुळे अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची वेळीच सुखरूप सुटका झाली.


Comments
Add Comment

Fire at a hospital : छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये आग; NICU मधील ९ बालकांसह ५८ रुग्णांची सुखरूप सुटका

छत्रपती संभाजीनगर : शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग

Pune traffic : पुण्यात श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ४ आणि ५ सप्टेंबरला 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Pune : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या

Rahul Shewale : नेपाळमध्ये अडकलेले ५४ भारतीय सुखरूप मुंबईत दाखल; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ५४ भारतीय भाविक अखेर सुखरूप

Tejas Express : गणेशोत्सवात तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना मिळणार उकडीचे मोदक; IRCTCचा खास उपक्रम

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या उत्सवी

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; सहभागासाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

मुंबई : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व

CM Devendra Fadnavis : पत्रकारांच्या आरोग्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार; विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर

मुंबई : सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळांमुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम