Fire at a hospital : छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये आग; NICU मधील ९ बालकांसह ५८ रुग्णांची सुखरूप सुटका

छत्रपती संभाजीनगर : शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, ज्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे, त्याच मजल्यावर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) ९ बालकांवर उपचार सुरू होते.


आग लागल्यानंतर रुग्णालयात धुराचे लोट पसरले. परिस्थिती लक्षात येताच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णवाहिका पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या ५८ रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यामध्ये NICU मधील ९ बालके, जनरल वॉर्डमधील ३६ रुग्ण आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.



बचावण्यात आलेल्या ९ बालकांना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, ५ बालकांना घाटी रुग्णालयात, ३ बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवल्याने ती इतर वॉर्ड आणि मजल्यांपर्यंत पसरण्याचा धोका टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अंतिम कारण अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.



दरम्यान, सर्व ९ बालकांची प्रकृती सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांच्यावर संबंधित रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पथकांकडून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Pune traffic : पुण्यात दहीहंडी आणि श्रीकृष्ण जयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ४ आणि ५ सप्टेंबरला 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Pune : श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या

Rahul Shewale : नेपाळमध्ये अडकलेले ५४ भारतीय सुखरूप मुंबईत दाखल; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

मुंबई : नेपाळमधील महापुरामुळे चीन-नेपाळ सीमेवर अडकलेले कैलास मानसरोवर यात्रेतील ५४ भारतीय भाविक अखेर सुखरूप

Tejas Express : गणेशोत्सवात तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना मिळणार उकडीचे मोदक; IRCTCचा खास उपक्रम

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या उत्सवी

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; सहभागासाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

मुंबई : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व

CM Devendra Fadnavis : पत्रकारांच्या आरोग्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार; विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर

मुंबई : सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळांमुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम

DJ Ban : १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा आणि आगामी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला असून गणेश मंडळे